क्रीडामंत्री किरेन रिजिजू कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करत दिली माहिती
क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना संसर्गात आणखी एका केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची लागण झाली असून मी एकदम फीट आहे, असे ट्वीट रिजिजू यांनी केलं आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर लिहिले की, 'कोविड 19 ची तपासणी केल्यानंतर माझा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे.' रिजिजूंनी लिहिले की, 'मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःवर लक्ष ठेवावे, स्वत: ला वेगळे ठेवावे आणि तपासणी करुन घ्यावी. शारीरिकदृष्ट्या मला तंदुरुस्त वाटत आहे
शुक्रवारी टिहरी येथे ‘वॉटर स्पोर्ट्स अँड अॅडव्हेंचर’ या संस्थेच्या उद्घाटनासाठी रिजिजू उत्तराखंडमध्ये होते. या उद्घाटन सोहळ्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत हेही त्यांच्या सोबत होते, जे नुकतेच या संक्रमणातून बरे झाले आहेत. गुरुवारी रिजिजूंनी उत्तरकाशी जिल्ह्यातील निलोंग व्हॅली प्रदेशाला भेट दिली. ज्यात इंडो-तिबेट सीमा पोलिस (आयटीबीपी) महासंचालक सुरजितसिंग देसवाल हे देखील त्यांच्यासमवेत होते.
खेळांव्यतिरिक्त, रिजिजू यांना अलीकडेच आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी (आयुष) मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. कारण श्रीपाद येसो नायक यांना अपघातानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेशच्या अरुणाचल पश्चिम मतदारसंघाचे लोकसभेचे खासदार रिजीजू अल्पसंख्यांक कार्यमंत्री देखील आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
