Kidney Donate : सलाम...! हिंदू धर्मिय मित्राला वाचवण्यासाठी मुस्लिम मित्राने दान केली किडनी
Kidney Donate News : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या हिंदू मित्राला किडनी दान देत बंधुप्रेमाचे उदाहरण मांडलं आहे.
Kidney Donate News : पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीने आपल्या हिंदू मित्राला किडनी दान देत बंधुप्रेमाचे उदाहरण मांडलं आहे. हसलू मोहम्मद असं या व्यक्तीचं नाव असून मित्राला किडनी दान देण्यासाठी त्याने आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. अर्जदार आपली किडनी दान करत आहे की पैशाच्या बदल्यात करत आहे, जे बेकायदेशीर आहे, याचा तपास करण्यासाठी आरोग्य विभागाने अर्ज स्थानिक पोलिसांकडे पाठवला.
या दरम्यान, पोलिसांनी तपासात कोणताही आर्थिक व्यवहार होत नसल्याचे स्पष्ट केले. याबाबतचा अहवाल लवकरच आरोग्य विभागाला पाठवण्यात येणार असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हसलू मोहम्मद आणि अचिंत्य बिस्वास यांची सहा वर्षांपूर्वी मैत्री झाली जेव्हा ते एका छोट्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करायचे. दोन वर्षांपूर्वी हसलू यांनी नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. “जेव्हा मी ऐकले की अचिंत्याला त्वरित प्रत्यारोपणाची गरज आहे, तेव्हा मी माझी एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. असे केल्याने मी मरणार नाही, तर अचिंत्याला नवीन जीवन मिळेल,” असं हसलू म्हणाला.
धार्मिक आदराबद्दल विचारले असता हसलू म्हणाले की, मानवी जीवन सर्वात मौल्यवान आहे. "आमचा धर्म वेगळा असू शकतो पण आमचा रक्तगट एकच आहे."
28 वर्षीय अचिंत्य डायलिसिससाठी खासगी रुग्णालयात दाखल आहे. त्यांना आठ वर्षांचा मुलगा आहे. हसलूने माझा जीव वाचवण्यासाठी एवढा मोठा त्याग करण्याचे ठरवले. मी आणि माझे कुटुंब त्यांचे सदैव ऋणी राहू. तो पुढे आला नसता तर माझ्या मृत्यूनंतर माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले असते,''अचिंत्य म्हणाला.
हसलू मोहम्मद आणि अचिंत्य बिस्वास यांची सहा वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. त्यावेळ हे दोघे मित्र उत्तर दिनाजपूरमध्ये एका छोट्या फायनान्स कंपनीत एजंट म्हणून काम करायचे.
महत्वाच्या बातम्या :
गुजरात सरकारचा मोठा निर्णय, सहावी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha