एक्स्प्लोर

kharif season Rice : सरकारनं तांदूळ खरेदीचं लक्ष्य वाढवलं, खरीप हंगामात करणार 521.27 लाख टन तांदूळ खरेदी 

kharif season : चालू खरीप हंगामात सरकारनं 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे.

kharif season : सरकारनं चालू खरीप हंगामात 521.27 लाख टन तांदूळ खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे प्रमाण मागील वर्षीपेक्षा अधिक ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी खरीप हंगामात 496 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आली होती. खरीप (उन्हाळी-पेरणी) आणि रब्बी (हिवाळी-पेरणी) या दोन्ही हंगामात भात पीक घेतले जाते.

ऑक्टोबर-सप्टेंबर या कालावधीत येणाऱ्या खरीप विपणन हंगाम (KMS) 2023-24 खरीप पिकाच्या खरेदी व्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी राज्याचे अन्न सचिव आणि भारतीय अन्न महामंडळ (FCI) यांची बैठक घेतली. आगामी 2023-24  च्या खरीप पीक हंगामात दरम्यान 521.27 लाख टन तांदूळ खरेदीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. मागील वर्षीच्या 518 लाख टनांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, मागील वर्षी 496 लाख टन प्रत्यक्षात तांदळाची खरेदी करण्यात आली. अन्न मंत्रालयानं याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.  

कोणत्या राज्यात किती तांदूळ खरेदीचं उद्दीष्ट 

केंद्रीय अन्न मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंजाबमध्ये 122 लाख टन, छत्तीसगडमध्ये 61 लाख टन, तेलंगणा 50 लाख टन, ओडिशा 44.28 लाख टन, उत्तर प्रदेश 44 लाख टन तांदूळ खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच हरियाणामध्ये 40 लाख टन, मध्य प्रदेशमध्ये 34 लाख टन, बिहारमध्ये 30 लाख टन, आंध्र प्रदेश 25 लाख टन, पश्चिम बंगालमध्ये 24 लाख टन आणि तामिळनाडूत 15 लाख टन तांदूळ खरेदीचं उद्दीष्ट आहे. दरम्यान, 203-24 मध्ये राज्यांकडून 33.09 लाख टन भरड धान्य खरेदीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 2022-23 च्या तुलेनेत यावर्षी खरेदीत मोठी वाढ करण्यात येणार आहे. 

 यावर्षी देशात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ

देशात यावर्षी भात लागवडीच्या (Paddy sowing) क्षेत्रात वाढ झाली आहे. कृषी मंत्रालयानं (Ministry of Agriculture) दिलेल्या माहितीनुसार भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ झाली आहे. आत्तापर्यंत देशात 328.22 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत देशात 312.80 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. तर या खरीप हंगामात 11 ऑगस्टपर्यंत कडधान्य, तेलबिया, कापूस आणि ताग यांच्या लागवडीत घट झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे. 

आसाम, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमध्ये भात लागवड क्षेत्रात घट

मागील वर्षीचा विचार करता यावर्षी देशात भात लागवडीच्या क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही राज्यांमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत कमी लागवड झाली आहे. कमी लागवड झालेल्या राज्यांमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश आणि आसाम या राज्यांचा समावेश आहे. या खरीप हंगामात आतापर्यंत ओडिशात  18.97 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. जी मागील वर्षी याच हंगामात 20.356 लाख हेक्टर होती. त्याचप्रमाणे, आंध्र प्रदेशात यावर्षी 6.86 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 8.28 लाख हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली होती. तर आसाममध्येही यावर्षी 14.92 लाख हेक्‍टर क्षेत्रावर भाताची पेरणी झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत 16.25 लाख हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. भरड तृणधान्य क्षेत्राच्या लागवडीच किरकोळ वाढ झाली आहे. खरीप हंगामात आतापर्यंत लागवडीखालील क्षेत्र हे 171.36 लाख हेक्‍टरवर पोहोचले आहे. जे मागील वर्षीच्या याच हंगामात 167.73 लाख हेक्‍टर होते.

महत्त्वाच्या बातम्या:

Paddy sowing : देशात भात लागवड क्षेत्रात पाच टक्क्यांची वाढ, तर तेलबियांसह कापूस लागवडीत घट; वाचा कृषी मंत्रालयाची आकडेवारी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
Gujarat Election :  एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात, गुजरातमध्ये अनोखा प्रकार, उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस
एकच उमेदवार तीन पक्षांकडून निवडणुकीच्या रिंगणात,उमेदवार नेमका कोणत्या पक्षाचा , भाजप, आप की काँग्रेस?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Maharashtra Monsoon : यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकरी चिंतेत
Maharashtra Monsoon : यंदा महाराष्ट्रात किती पाऊस पडणार? भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाहीर, शेतकरी चिंतेत

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Bihar : बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, नवी दिल्ली ते पाटणा राजकीय घडामोडी वाढल्या
बिहारमध्ये पहिल्यांदा भाजपचा मुख्यमंत्री होणार, नितीश कुमार राजीनामा देणार, राजकीय घडामोडी वाढल्या
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
ह्रदयद्रावक... कल्याणमधील अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; तहसील कार्यालातील अधिकारी ठार
Home Loan : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, सर्वात कमी व्याज दरावर गृह कर्ज कोण देते? जाणून घ्या प्रमुख बँकांचे व्याज दर 
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
मस्साजोगच्या सरपंच पदासाठी 5 जणांचे अर्ज; अश्विनी देशमुखांच्या विरोधात उमेदवार मैदानात, निवडणूक की बिनविरोध?
ED Raid On Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
भोंदू अशोक खरातच्या घराची ईडीकडून झाडाझडती, 60 कोटींच्या व्यवहारांचा तपास सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 एप्रिल 2026 | सोमवार
Embed widget