(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KFCचा 'चिकन' शब्दावर कोणताही विशेष अधिकार नाही : उच्च न्यायालय, नेमकं प्रकरण काय?
KFC Chicken : चिकन' (Chicken) शब्दावर केएफसीचा (KFC) कोणताही विशेष अधिकार नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) म्हटलं आहे.
KFC Chicken : प्रसिद्ध फास्ट फूड कंपनी केएफसी (KFC) चिकन (Chicken) या शब्दावर कोणताही विशेष अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही, असं दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) म्हटलं आहे. मल्टीनॅशनल फास्ट फूड चेन केएफसीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी देताना हे निरीक्षण नोंदवलं आहे. बहुराष्ट्रीय फास्ट फूड शृंखला (Fast Food Restaurant Chain) केएफसी (KFC) 'चिकन' या शब्दाच्या वापरावर विशेष दावा करू शकत नाही, असा निर्णय एका दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे.
केंटकी फ्राइड चिकन इंटरनॅशनल (Kentucky Fried Chicken) होल्डिंग्ज एलएलसीने ट्रेडमार्कच्या वरिष्ठ परीक्षकाने कंपनीच्या 'चिकन झिंगर' ला ट्रेडमार्क (Trademark) म्हणून नोंदणी करण्याची विनंती नाकारल्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने हा निर्णय दिला. PTI ने याबाबत अहवाल दिला आहे.
केएफसीने ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडे 'चिकन झिंगर' (Chicken Zinger) शब्दावर ट्रेडमार्क (Trademark) म्हणून विशेष अधिकार असल्याचा दावा करत अर्ज केला होता. ट्रेडमार्क रजिस्ट्रीने हा अर्ज फेटाळला. त्यानंतर केएफसीने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे की, केएफसी चिकन' शब्दाच्या वापरावर कोणताही अधिकृत दावा करु शकत नाही.
न्यायालयाने ट्रेडमार्क रजिस्ट्रीला 'चिकन झिंगर' (Chicken Zinger) या चिन्हासाठी नोंदणी अर्जासंदर्भात जाहिरात प्रकाशित करण्याचे आणि नोंदणीच्या कोणत्याही विरोधाला तीन महिन्यांच्या आत संबोधित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं आहे की, 'याचिकाकर्त्याला "चिकन" या शब्दावर कोणताही विशेष अधिकार नसेल. ट्रेडमार्क रजिस्ट्रीकडून याबाबत जाहिरातीवेळी सूचना देणे आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या