Keshub Mahindra Passes Away: ज्येष्ठ उद्योगपती केशुब महिंद्रा यांचं निधन, वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Keshub Mahindra Passes Away: 1963 ते 2012 या काळात ते महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष होते. 2012 मध्ये त्यांनी सगळी सूत्र आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवली.
Keshub Mahindra Passes Away: ज्येष्ठ उद्योगपती आणि आनंद महिंद्रांचे (Anand Mahindra) काका केशुब महिंद्रा यांचं निधन झालं. वयाच्या 99 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वर्षांचे होते. INSPACe चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी ही माहिती ट्विट करत दिली आहे. उद्योग जगतातील सर्वात महान व्यक्तीला आज आपण गमावले आहे.
1963 ते 2012 या काळात ते महिंद्रा अँड आणि महिंद्रा समुहाचे अध्यक्ष होते. 2012 मध्ये त्यांनी सगळी सूत्र आनंद महिंद्रा यांच्याकडे सोपवली. केवळ विलीज जीप या कारची जोडणी करणारी कंपनी ही महिंद्राची ओळख त्यांनी पुसून काढली. प्रवासी वाहनं, मालवाहू वाहनं तसंच ट्रॅक्टरमध्ये महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा होता. अनेक कंपन्यांच्या बोर्डावर ते संचालकही राहिले. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, ताज हॉटेल अशा अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी संचालक म्हणून सेवा दिली.
The industrial world has lost one of the tallest personalities today. Shri Keshub Mahindra had no match; the nicest person I had the privilege of knowing. I always looked forward to mtgs with him and inspired by how he connected business, economics and social matters. Om Shanti.
— Pawan K Goenka (@GoenkaPk) April 12, 2023
फोर्ब्सने जारी केलेल्य 2023 च्या अरबपतींच्या यादीत केशुब महिंद्रा (Keshub Mahindra Passes Away)यांचा समावेश होता. फोर्ब्सच्या बिलिनिअर्स लिस्टनुसार केशुब महिंद्रा 1.2 बिलियन डॉलर (Keshub Mahindra Net Worth) संपत्ती सोडून गेले आहे. केशुब महिंद्रा यांनी पेन्सिलवेनिया विद्यापीठातून पदवी मिळावल्यानंतर 1947 सालापासून महिंद्रा ग्रुपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1963 साली महिंद्रा ग्रुपचे ते चेअरमन झाले.
महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा
महिंद्रा कंपनीला अग्रस्थानी पोहोचवण्यात केशुब यांचा सिंहाचा वाटा होता. फक्त देशातच नाही तर जगभरात त्यांनी कंपनीचा विस्तार केला. महिंद्रा अॅन्ड महिंद्रा आपल्या ट्रॅक्टरबरोर, एसयूव्ही बरोबर हॉस्पिटॅलिटी, रिअल इस्टेट आणि सॉफ्टवेअर सर्व्हिससाठी देखील ओळखले जाते. उद्योग क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल 1987 साली त्यांना फ्रान्स सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने देखील गौरवण्यात आले. याशिवा. केशुब महिंद्रा यांना 2007 साली Ernst and Young तर्फे लाईफटाईम अचिव्हमेंट या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.