एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांची वर्णी
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी योगी आदित्यनाथ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची आज लखनऊमध्ये बैठक झाली. त्यामध्ये त्यांच्या नावार एकमत झालं. उद्या (19 मार्च) योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. याशिवाय दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार आहे.
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार याबाबत बरेच तर्कवितर्क सुरु होते. अखेर आज योगी आदित्यनाथ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. आज सुरुवातीला मनोज सिन्हा, केशव मौर्य यांचं नाव आघाडीवर होतं. पण या दोघांना मागे टाकत योगी आदित्यनाथ यांनी शेवटच्या क्षणी बाजी मारली.
योगी आदित्यनाथ हे आज चार्टर्ड विमानं दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर भाजपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा झाल्यानं अनेकांच्या भुवयाही उंचावल्या आहेत. कट्टर हिंदुत्ववादी अशी आजवर आदित्यनाथ यांची ओळख आहे. त्यामुळे विकासाच्या राजकारणासोबत भाजप या निमित्तानं हिंदुत्वाचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न करीत असल्याचीही जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
योगी आदित्यनाथ यांचा अल्प परिचय :
- महंत योगी आदित्यनाथ यांचा जन्म ५ जून १९७२ रोजी उत्तराखंडच्या गढवालमध्ये झाला. त्यांचं मुळ नाव अजय सिंह असं आहे.
- गढवाल विश्वविद्यालयातून त्यांनी बीएससीपर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आहे.
- 1998 पासून ते गोरखपूर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून येत आहेत.
- याशिवाय आदित्यनाथ हे गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिराचे प्रमुख महंत आहेत.
- ते दिवंगत खासदार व हिंदू महासभेचे अध्यक्ष महंत अवैद्यनाथ ह्यांचे वारसदार मानले जातात.
दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री असलेले राजनाथ सिंह यांना उत्तर प्रदेशमध्ये पाठवण्याची चर्चा सुरु होती. मात्र, राजनाथ सिंह यांनी ही शक्यता फेटाळून लावली होती.
पूर्व उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा सर्वात मोठा चेहरा असलेले योगी आदित्यनाथही मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या विजयात महत्वाची भूमिका निभावणारे केशव प्रसाद मौर्य यांच नावही चर्चेत होतं. मात्र पक्षानं अखेर योगी आदित्यनाथ यांच्या पारड्यात वजन टाकलं.
संबंधित बातम्या:
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा सस्पेंस संपणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement