केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन, मृतांचा आकडा 23 वर, अजूनही अनेकजण ढिगाऱ्याखाली!
केरळ राज्यातील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनाची मोठी घटना घडली आहे. या भूस्खलानात शेकडो दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
तिरुअनंतपुरम : केरळमधील वायनाड (Kerala Wayanad landslide) या जिल्ह्यात भूस्खलनाची भीषण घटना घडली आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हे भूस्खलन वायनाडमधील मेप्पाडी या डोंगराळ भागात झाले आहे. या दुर्घटनेत शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली बदले आहेत. ढिगाऱ्यातून आतापर्यंत 23 जणांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून बचावकार्य चालू आहे.
केंद्रीय यंत्रणांकडून बचाकार्यास सुरुवात
केरळच्या आरोग्यंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 23 वर पोहोचला आहे. भूस्खलानाची ही घटना मेप्पाडी या भागात झाली आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले आहे. याच पावसामुळे मेप्पाडी भागातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार या ढिगाऱ्यात शेकडो नागरिक दबल्याचे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती होताच सरकारी बचाव यंत्रणा कामाला लागल्या आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही बचावकार्यात उडी घेतली आहे. आरोग्य मंत्रालयाने हेल्पलाईन नंबर जारी केले असून एका कंट्रोल रुमची स्थापना केली आहे.
Wayanad landslide | In the wake of the Wayanad landslide, the Health Department opened the district level control room and released two helpline numbers, 8086010833 and 9656938689, for emergency health services. All hospitals including Vaithiri, Kalpatta, Meppadi and Mananthavadi… https://t.co/Mq62vx1fbL
— ANI (@ANI) July 30, 2024
आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले
बचावकार्यासाठी हवाईदलाचे Mi-17 आणि ALH हे दोन हेलिकॉप्टर्सही तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाने उभ्या केलेल्या कंट्रोल युनिटच्या मदतीने दुर्घटनाग्रस्तांची मदत केली जात आहे. उपचारासंबंधीची कोणतीही मदत लागल्यास 8086010833 आणि 9656938689 या दोन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच वैथिरी, कालपट्टा, मेप्पाडी मनंथावडी या भागातील रुग्णालये तयार ठेवण्यात आली आहेत. भूस्खलनाची घटना घडताच आरोग्य कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी लवकरच आणखी आरोग्य कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. तशी माहिती केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे.
वेगवेगळ्या विभागाकडून बचावकार्यात मदत
घटनेचं गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाचे जवान, सिव्हिल डिफेन्स तसेच एनडीआरएफ विभागानेही घटनास्थळी दधाव घेतली असून बचावकार्य केले जात आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाचे एकूण 250 जवान आहेत. छुरामाला या भागात सध्या हे बचावकार्य केले जात आहे.
हेही वाचा :