एक्स्प्लोर

Beed crime: बीडमध्ये गुंडाराज, टोळक्याने बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचं डोकं फोडलं, नेकनूरमध्ये दोन गटात हाणामारी

या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून अशा पद्धतीने दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. (

Beed Crime: बीडमध्ये मारहाण आणि दहशतीच्या घटना काही केल्या संपत नाहीत. किरकोळ वादातून मोठा जमाव येतो आणि लाठ्या काठ्या, लोखंडी सळ्या कहार शस्त्राने जीवघेणा हल्ला करतो, अशा घटना बीडमध्ये रोजच्या झाल्या आहेत. काल रात्री (27 डिसेंबर) बीडमध्ये दोन गंभीर मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. बीड शहरात 6 ते 7 जणांच्या टोळक्याने सुभाष हुंबिरे नामक व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. हल्लेखोरांनी बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचे डोके फोडले. तर दुसऱ्या घटनेत बीडचा नेकनूरमध्ये हातात लाकडी दांडके घेऊन भर रस्त्यात हाणामारी करत दहशत माजवण्याचा प्रकार घडला. दोन्ही गटातील जखमींवर उपचार सुरू आहेत. या दोन्ही घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून अशा पद्धतीने दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Beed Crime)

बंदुकीच्या मुठीने व्यापाऱ्याचा डोकं फोडलं 

बीडमध्ये मारहाण दहशतीच्या घटना सुरूच आहेत. काल रात्री बीड शहरात 6 ते 7 जणांच्या टोळक्याने सुभाष हुंबरे नामक व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात हुंबरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरातील अंबिका चौक परिसरात असलेल्या तुळजाई ट्रेडिंग कंपनी कार्यालयात सुभाष हुंबरे बसले असताना अचानक सहा ते सात जणांनी कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी बंदुकीच्या मुठीने मारहाण केल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर घटनास्थळी पोलिसांना हल्लेखोरांकडे असलेली एक बंदूक आढळून आली. या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे

हातात लाकडी दांडके, भर रस्त्यात हाणामारी

बीडच्या नेकनूर येथे भर रस्त्यावर दोन गटात हाणामाऱ्या झाल्या यामध्ये दोन्ही गटातील काही लोक जखमी झाले. यामुळे नेकनूर गावामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. दरम्यान ही मारामारी सुरू होण्यापूर्वी हातात लाकडी दांडके व इतर वस्तू घेऊन जाताना काही लोक दिसत आहेत. असा व्हिडिओ समोर आला असून अद्याप या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही.. परंतु या घटनेमुळे नेकनूर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.. अशा पद्धतीने भर रस्त्यावर मारहाण करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur Leopard Attack: महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
महाकालीच्या दर्शनासाठी पायी चाललेल्या नऊ वर्षीय चिमुकल्यावर बिबट्याची झडप; ऐन वर्दळीत हल्ला अन् एकच थरकाप उडाला, चंद्रपूरच्या विसापुरात खळबळ!
Amravati Accident News: भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
भीषण अपघात! अमरावतीत भरधाव हायड्रा क्रेनची 5 मजुरांना धडक; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर, यावली शहीद-अडगाव मार्गावरील घटना
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन कोणी कारवाया केल्यास निलंबन; FDA च्या अधिकाऱ्यांना मंत्री नरहरी झिरवाळांची वॉर्निंग
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार

व्हिडीओ

Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha
SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Milk Union Election 2026 : गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
गोकुळसाठी आज मतदान, उद्या गुलाल; 35 केंद्रांवर होणार मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, उत्कंठा शिगेला
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
चिपळूण, सांगलीसह अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी; आता किती दिवस कोसळणार?
Kolkata Stampede Marathi News: कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
कुठे पर्स, कुठे विखुरलेल्या चप्पल; दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी, 19 जणांचा मृत्यू, कोलकातामधील थरकाप उडवणारे 8 फोटो
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
दिवाळीचा शिधा दसऱ्यादिवशी रवाना करणार, शेतकऱ्यांची दिवाळी काळी होणार नाही, दिलेला शब्द पाळणार : एकनाथ शिंदे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 24 वर्षीय तरुणीला संपवलं; घराकडे जात असताना प्राणघातक हल्ला करून हल्लेखोर पसार
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
शिवसेना नेत्या शायना एनसींच्या मुलीचा साखरपुडा; राज ठाकरेंसह बॉलिवूडचा भाईजान उपस्थित, नव दाम्पत्यास शुभेच्छा
Uddhav Thackeray: मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
मग दिल्लीत हजारो पोलिस दांडिया खेळायला आणलेत का? अशी राजवट गाडलीच पाहिजे आणि ती गाडण्यासाठीच आम्ही सगळे उभे आहोत; उद्धव ठाकरेंचं राजनाथ सिंहांना प्रत्युत्तर
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
तुमची शांतताच हुकूमशाहीला बळ देते! भाजपच्या विरोधात बोलणे म्हणजे देशद्रोह नाही, भाजप म्हणजे भारत नव्हे आणि भारत म्हणजे भाजप नव्हे; पूजा बेदीचा हल्लाबोल
Embed widget