एक्स्प्लोर

PM Modi : तेलंगणामध्येपंतप्रधान मोदींचा गौप्यस्फोट, केसीआर यांना एनडीएमध्ये यायचे होते...

PM Modi On KCR : के. सी. चंद्रशेखर राव यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, आम्ही तो प्रस्ताव फेटाळला असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान मोदी यांनी केला.

हैदराबाद :  तेलंगणामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) निजामाबादमधील जाहीर सभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. भारत राष्ट्र समितीचे (BRS) अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (
Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao) यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) सामील व्हायचे होते, असा दावा त्यांनी केला. 

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की,"तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कट्टर विरोधकांपैकी एक समजले जातात. त्यांना पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील व्हायचे होते, परंतु मी त्यांना आघाडीत सामील होण्यास नकार दिला असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले.

पंतप्रधान म्हणाले की केसीआर यांना माहित आहे की त्यांच्या भारत राष्ट्र समितीने (बीआरएस) एनडीएमध्ये सामील होण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र, आम्ही तेलंगणातील लोकांचा विश्वासघात करणार नाही, असे सांगत नकार दिला. या नकारानंतर त्यांचे डोकं फिरले असल्याचेही मोदींनी म्हटले. 

लोकशाहीला लुटीचे साधन केले

पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, या लोकांनी लोकशाहीला लुटण्याच्या व्यवस्थेत बदलले आहे. त्यांनी लोकशाहीचे रुपांतर घराणेशाहीत केले आहे. हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीनंतर ते दिल्लीला भेटायला आले. त्यांनी माझ्याबद्दल प्रचंड प्रेम दाखवले. केसीआर यांचं असणे वागणं त्यांच्या स्वभावाला घेऊन नाही. केसीआर यांनी त्या भेटीत देश प्रगती करत असल्याचे म्हटले असल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. 

लोकांची फसवणूक कशी करणार?

पंतप्रधान मोदी म्हणाले की, केसीआर यांनी माझ्याकडे एनडीएमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांनी मला हैदराबाद महापालिका निवडणुकीत मदत करण्याची विनंती केली. परंतु मी त्यांना नकार दिला. आम्ही तेलंगणातील लोकांना फसवू शकत नाही असे सांगितले. त्यामुळे त्यांना राग आला असल्याचे केसीआर यांनी म्हटले. 

बीएसआरचा पलटवार 

के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने पंतप्रधान मोदी यांचा दावा फेटाळून आला. बीआरएसचे केटी रामाराव म्हणाले की,  भाजपला फेक न्यूजची मोठी फॅक्टरी असल्याचे म्हणतात. पंतप्रधान मोदी स्वतः व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीचे कुलपती असल्याचा टोला त्यांनी लगावला. 

बीआरएस नेते म्हणाले, "पंतप्रधान मोदी म्हणाले की कर्नाटकमध्ये बीआरएसने काँग्रेसला निधी दिला आणि त्यांनी आम्हाला एनडीएमध्ये सामील होऊ दिले नाही. आम्हाला काही पिसाळलेल्या कुत्र्याने चावले का की आम्ही एनडीएमध्ये सामिल होऊ का? आज शिवसेना, जेडीयू, टीडीपीसह अनेक पक्ष शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. भाजपसोबत कोण आहे? सीबीआय, ईडी आणि आयटी व्यतिरिक्त तुमच्याकडे कोण आहे? असा प्रश्न त्यांनी केला. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget