एक्स्प्लोर
Advertisement
कौरव टेस्ट ट्यूब बेबी होते, आंध्र विद्यापीठाच्या कुलगुरुंचा अजब दावा
हजारो वर्षांपूर्वी महाभारतात विज्ञानाचा अभ्यास केला जात असे. भगवान विष्णूचे दशावतार इंग्रज शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी दिलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे वर्णन करतात, असं ते म्हणाले.
जालंधर : आंध्र विद्यापीठाचे कुलगुरु जी नागेश्वर राव यांनी महाभारतासंबंधी अजब दावा केला आहे. महाभारतातील कौरवांचा स्टेम सेल रिसर्च आणि टेस्ट ट्यूब बेबी पद्धतीने जन्म झाला होता, असा दावा त्यांनी केला आहे. हजारो वर्षांपूर्वी महाभारतात विज्ञानाचा अभ्यास केला जात असे. भगवान विष्णूचे दशावतार शास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी दिलेल्या उत्क्रांतीच्या सिद्धांताचे वर्णन करतात, असं ते म्हणाले.
'मी रामायण आणि महाभारताचा अभ्यास केला आहे. भारतीय संस्कृतीसाठी विज्ञान ही नवी गोष्ट नाही. महाभारत आणि रामायणातसुद्धा विज्ञानाचा प्रसार झाला होता', असं कुलगुरु नागेश्वर राव म्हणाले. गांधारी आपल्या जीवनकालात 100 मुलांना जन्म देऊ शकली, कारण ते मुलं स्टेम सेल रिसर्च आणि टेस्ट बेबी प्रक्रियेने जन्माला घातली गेली होती, असेही राव म्हणाले.
जी नागेश्वर राव भारतीय विज्ञान काँग्रेस या कार्यक्रमात बोलत होत. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर ते म्हणाले, रामायाणात रामाकडे अस्त्र आणि शस्त्र होते. हे अस्त्र लक्ष्याला भेदून वापस परतत असे. यावरुन हे सिद्ध होतं की, मिसाईलचा शोध रामायणातच लागला होता. तसेच रावणाकडे फक्त पुष्पक विमानचं नव्हता, तर विविध प्रकारचे 24 विमानं होती आणि त्यासाठी त्याने विमानतळंही बनवले होते, असा जावईशोध राव यांनी लावला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement