एक्स्प्लोर
महाकाल एक्स्प्रेसमध्ये शंकराचं मंदिर बनवून सीट राखीव, ओवेसींकडून संविधानाची प्रस्तावना ट्वीट
काशी महाकाल एक्स्प्रेसमध्ये भगवान शंकरासाठी एक सीट आरक्षित असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेले रेल्वेच्या B-5 या डब्यात 64 नंबरची सीट महादेवासाठी राखीव असेल.

मुंबई : स्टेशनवरील धार्मिक स्थळाबाबत तुम्ही ऐकलं असेल, पण रेल्वेमध्ये कधी मंदिर पाहिलं आहे का? याचं उत्तर नाही असेल तर लवकरचा तुम्हाला भगवान शंकरासोबत ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. काशी महाकाल एक्स्प्रेसमधील एका सीटला मंदिराचं रुप देण्यात आलं आहे, ज्यात भगवान शंकराची मूर्तीही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (16 फेब्रुवारी) या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. ज्या डब्यात हे मंदिर बनवलं आहे, त्याचे फोटोही समोर आले आहे. काशी महाकाल एक्स्प्रेसच्या B-5 या डब्यात 64 नंबरची सीट महादेवासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी ते मध्य प्रदेशच्या इंदूरपर्यंत या ट्रेनचा मार्ग असेल. ही रेल्वे इंदूरजवळ ओंकारेश्वर, उज्जैनमध्ये महाकालेश्वर आणि वाराणसीमध्ये काशी विश्वनाथ या तीन ज्योतिर्लिंगांना जोडणार आहे. भगवान शंकरासाठी B-5 या डब्यात 64 क्रमांकाचं आसन राखीव ठेवण्यात आलं आहे, असं उत्तर रेल्वेचे प्रवक्ते दीपक कुमार यांनी सांगितलं. विशेष म्हणजे महादेवासाठी सीट राखीव ठेवल्यानंतर ट्रेनमध्ये 'भोले बाबा'साठी एक सीट कायमची आरक्षित ठेवण्याबाबत रेल्वे प्रशासन विचार करत आहे. दरम्यान भगवान शिवसाठी एक सीट आरक्षित ठेवल्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ओवेसी यांनी ट्विटरवर संविधानाच्या प्रस्तावनेचा फोटो पोस्ट करुन पंतप्रधान कार्यलयाला मेंशन करत, काशी महाकाल एक्स्प्रेसमधील महादेवाच्या सीटचं वृत्त रिट्वीट केलं आहे.
"महादेवासाठी सीट रिकामी आणि आरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सीटवर एक मंदिरही बनवण्यात आलं आहे, जेणेकरुन ही सीट मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालसाठी राखीव आहे, हे प्रवाशांना समजेल," असं दीपक कुमार म्हणाले. तसंट ही सीट कायमची भगवान शंकरासाठी आरक्षित ठेवण्याचा विचार सुरु असल्याचं दीपक कुमार यांनी सांगितलं. ट्रेनमध्ये भक्तिगीतं, सीसीटीव्ही कॅमेरे, शाकाहारी जेवण वाराणसी ते इंदूर दरम्यान आठवड्यात तीन वेळा धावणाऱ्या या ट्रेनमध्ये भक्तिगीतं वाजत राहतील. तसंच प्रत्येक डब्यात दोन खासगी सुरक्षारक्षक असतील. शिवाय प्रत्येक डब्यात सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. तसंच प्रवाशांना शाकाहारी जेवण दिलं जाईल. ही ट्रेन 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे.
सीट कायमची आरक्षित ठेवण्याचा विचारSir @PMOIndia https://t.co/HCeC9QcfW9 pic.twitter.com/6SMJXw3q1N
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 17, 2020
"महादेवासाठी सीट रिकामी आणि आरक्षित ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या सीटवर एक मंदिरही बनवण्यात आलं आहे, जेणेकरुन ही सीट मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालसाठी राखीव आहे, हे प्रवाशांना समजेल," असं दीपक कुमार म्हणाले. तसंट ही सीट कायमची भगवान शंकरासाठी आरक्षित ठेवण्याचा विचार सुरु असल्याचं दीपक कुमार यांनी सांगितलं. ट्रेनमध्ये भक्तिगीतं, सीसीटीव्ही कॅमेरे, शाकाहारी जेवण वाराणसी ते इंदूर दरम्यान आठवड्यात तीन वेळा धावणाऱ्या या ट्रेनमध्ये भक्तिगीतं वाजत राहतील. तसंच प्रत्येक डब्यात दोन खासगी सुरक्षारक्षक असतील. शिवाय प्रत्येक डब्यात सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असेल. तसंच प्रवाशांना शाकाहारी जेवण दिलं जाईल. ही ट्रेन 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















