एक्स्प्लोर
पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयकडून अटक
लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली.
![पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयकडून अटक karti chidambaram arrested by cbi in inx media money laundering case पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयकडून अटक](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/19132324/kARTI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
चेन्नई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती यांना सीबीआयने चेन्नईतून अटक केली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी झालेल्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांप्रकरणी कार्तीला अटक करण्यात आली.
लंडनला गेलेले कार्ती चेन्नई विमानतळावर परत येताच त्यांना अटक करण्यात आली. चेन्नई विमानतळावरच सीबीआयकडून कार्ती यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दिल्लीला नेलं जाणार आहे.
आयएनएक्स मीडियामध्ये 2007 साली 300 कोटींची परकीय गुंतवणूक आणण्यासाठी परवानगी घेताना गैरप्रकार झाल्याचा कार्ती यांच्यावर आरोप आहे. त्यावेळी पी. चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. याप्रकरणी कार्ती यांच्यावर गेल्या वर्षी मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सातारा
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)