एक्स्प्लोर

Hijab Ban: हिजाब बंदी काँग्रेस हटवणार? कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार म्हणतात...

Hijab Ban In Karnatka: काँग्रेसच्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी हिजाब वादासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. काँग्रेस हिजाब बंदी हटवेल, असं कनीज फातिमा म्हणाल्या आहेत.

Kaneez Fatima On Hijab Ban In Karnatka: कर्नाटक निवडणुकांपूर्वी (Karnataka Election 2023) कर्नाटकात हिजाब बंदीचा (Hijab Ban) मुद्दा गाजला होता. त्यानंतर निवडणुकीतही भाजपनं (BJP) ️हिजाबचा मुद्दा लावून धरला होता. कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपच्या पराभवाच्या कारणांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कारण 'हिजाब वाद' (Karnataka Hijab Raw) हेदेखील असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अशातच कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळालं असून आता काँग्रेसचं नवनिर्वाचित सरकारही स्थापन झालं आहे. अशातच ज्या मतदारसंघातून हिजाब वादाला सुरुवात झालेली, त्या भागातून निवडून आलेल्या कर्नाटकातील एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा (Congress MLA Kaneez Fatima) यांनी हिजाब वादासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत विजयी झालेल्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी हिजाब वादाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेस हिजाबवरील बंदी हटवेल. यासोबतच मुस्लिमांना मिळणारं आरक्षण काँग्रेस पुन्हा लागू करेल, असंही त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, कर्नाटक निवडणुकांपूर्वी भाजपनं मुस्लिम समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करून लिंगायत आणि वोक्कलिगा समाजाचा आरक्षणाचा कोटा वाढवला होता.

द क्विंटमधील वृत्तानुसार, काँग्रेसच्या एकमेव मुस्लिम महिला आमदार कनीज फातिमा यांनी यापूर्वी देखील CAA आणि NRC विरोधात अत्यंत स्पष्ट आणि परखडपणे आपली मतं मांडली आहेत. गुलबर्गा उत्तर मतदारसंघातील आमदार फातिमा यांनी भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा सुमारे 3000 मतांनी पराभव केला होता. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत ही लढत अत्यंत रंजक ठरली होती. यामागील कारणंही अत्यंत महत्त्वाचं होतं. भाजपनं कर्नाटक निवडणुकीत हिजाबबंदीचा मुद्दा लावून धरला होता. तसेच, हिजाब वादाला गुलबर्गामधूनच सुरुवात झाली होती. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. 

कनीज फातिमा... कर्नाटकमधील एकमेव मुस्लिम महिला आमदार 

कनीज फातिमा यांना काँग्रेस नेतृत्वानं 2018 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणूक लढवण्यास सांगितलं तेव्हा त्यांना धक्काच बसला होता. सहा वेळा आमदार आणि दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेले त्यांचे पती कमर उल इस्लाम यांचं निधन होऊन एक वर्षही झालं नव्हतं. त्याच वेळी, हिजाब घातलेली मुस्लिम महिला भारतातील निवडणुकीच्या राजकारणाची पोस्टर फिगर कशी काय बनू शकेल असा प्रश्न होताच. पण असं असूनही, कनीज फातिमा यांनी गुलबर्गा उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास होकार दिला.

गुलबर्गा उत्तर मतदारसंघावर कनीज यांचे पती दिवंगत कमर-उल-इस्लाम यांनी तब्बल तीन दशकं कब्जा केला होता. ही जागा जिंकून, कर्नाटकच्या 224 सदस्यीय विधानसभेत त्या एकमेव मुस्लिम महिला आमदार ठरल्या आहेत. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, पण आधी 'हे' काम करा, अन्यथा...
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 मार्च 2026 | बुधवार
Bihar : बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 
बिहारमध्ये खांदेपालट! नितीश कुमार राज्यसभेवर, तर मुख्यमंत्री भाजपचा होणार? निशांत कुमारांचीही राजकारणात एन्ट्री 

व्हिडीओ

Special Report Iran vs America : ब्रिटनच्या वेगळ्या भूमिकेवरुनही ट्रम्प यांचा संताप
Special Report Raj Thackeray - Uddhav Thackeray : मनसे-ठाकरेसेनेतील नाराजीवर तोडगा निघाला?
Special Report Rajya Sabha : राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची घोषणा
Jalgaon Banana : केळीचे दर 2.500 रुपयांवरुन 1500 रुपयांवर, युद्धाचा उत्पादकांना फटका
Ajit Pawar plane crash spot Baramati : AIB च्या अहवालात विमान झाडाला धडकल्याचा उल्लेख, फॅक्ट काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना,वानखेडेवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून प्रेक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी 
भारत- इंग्लंड सामना पाहण्यासाठी वानखेडे स्टेडियमवर कसं पोहोचायचं? मुंबई पोलिसांकडून सूचना जारी
तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेसचं जमलं, राज्यसभेची एक जागा काँग्रेसला मिळणार, विधानसभेसाठी द्रमुकनं किती जागा सोडल्या?
तामिळनाडूमध्ये काँग्रेस-द्रमुकमधील जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेसला विधानसभेच्या किती जागा?
Iran vs America : भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू, व्हिडीओ जारी  
भारतातून परतणाऱ्या इराणच्या युद्धनौकेवर अमेरिकेचा हल्ला, पाणबुडीद्वारे क्षेपणास्त्राचा मारा, 80 जणांचा मृत्यू
Rajya Sabha Election : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागांसाठी 6 उमेदवार जाहीर, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार? 
Iran Israel Conflict : पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
पाकिस्तानातून बाहेर पडा, अमेरिकेचे नागरिकांना निर्देश; इराणने हल्ला न करण्याची पाकिस्तानची विनंती फेटाळली
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
धक्कादायक!  सासरच्या त्रासाला कंटाळून तरुणानं संपवलं जीवन, सासूसह तीन जणांवर जळगावमध्ये गुन्हा दाखल 
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
ह्रदयद्रावक... वडिलांना आणायला जाताना कारचा अपघात, दुर्घटनेत बहिणीचा मृत्यू, भाऊ गंभीर जखमी
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
नागपूर महापालिकेच्या आयुक्तांना हलवलं; राज्यातील दोन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुण्यात कुठं जबाबदारी?
Embed widget