(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Government : महसूलचे 'टार्गेट'! बंगळूरमध्ये नाईटलाईफची वेळ वाढवली, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
29 जुलै रोजी जारी केलेला आदेश ब्रुहत बंगळूर महानगर पालिकेच्या अखत्यारीतील आस्थापनांना लागू होतो, ज्यामुळे त्यांना पहाटे 1 वाजेपर्यंत दुकाने सुरु राहण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
बंगळूर : बंगळूरमधील नाईट लाईफला (In a boost to nightlife in Bengaluru) चालना देण्यासाठी कर्नाटक सरकारने हॉटेल, दुकाने, बार आणि परवानाधारक आस्थापनांची अंतिम मुदत मध्यरात्री एक वाजेपर्यत पर्यंत वाढवण्याचा आदेश जारी केला. या निर्णयामुळे सरकारला लक्षणीय महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. जाहीरनाम्यातील पाच हमींच्या अंमलबजावणीसाठी सरकारला मोठ्या महसूलाची आवश्यकता आहे. हमींची अंमलबजावणी करण्यासाठी वर्षाला सुमारे 55,000 कोटी रुपये खर्च येतो. राज्याच्या नगर विकास विभागाने 29 जुलै रोजी जारी केलेला आदेश ब्रुहत बंगळूर महानगर पालिकेच्या अखत्यारीतील आस्थापनांना लागू होतो, ज्यामुळे त्यांना पहाटे 1 वाजेपर्यंत दुकाने, आस्थापनांना पहाटे एक वाजेपर्यंत उघडे राहण्यासाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
परवानाधारक सकाळी 9 ते पहाटे 1 वाजेपर्यंत व्यवसाय करू शकतात
क्लब, हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमध्ये दररोज पहाटे 1 वाजेपर्यंत जेवण आणि मद्य दिले जाऊ शकते, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. आदेशानुसार, CL-4 (क्लबला परवाना), CL-6 (A) (स्टार हॉटेल परवाने), CL-7 (हॉटेल आणि बोर्डिंग हाऊस परवाने), आणि CL-7D (व्यक्तींच्या मालकीचे हॉटेल आणि बोर्डिंग हाऊस परवाने) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे) परवानाधारक सकाळी 9 ते पहाटे 1 वाजेपर्यंत व्यवसाय करू शकतात. ज्यांच्याकडे CL-9 (रिफ्रेशमेंट रूम (बार)) परवाना आहे ते सकाळी 10 ते पहाटे 1 वाजेपर्यंत काम करू शकतात.
ब्रुहथ बंगलोर हॉटेल्स असोसिएशनचे अध्यक्ष, पीसी राव म्हणाले, "आतापर्यंत, फक्त आयुक्तालयाच्या हद्दीतील बार आणि रेस्टॉरंट्सना पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी होती. आता, बीबीएमपी हद्दीतील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने पहाटे 1 वाजेपर्यंत सुरू राहतील." कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या 2024-2025 च्या अर्थसंकल्पीय भाषणात घोषणा केली होती की बंगळूर आणि इतर 10 कॉर्पोरेशन क्षेत्रात दुकाने आणि आस्थापना मध्यकरात्री 1 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली जाईल. तथापि, ही अधिसूचना केवळ BBMP मर्यादेशी संबंधित आहे.
इतर महत्वाच्या बातम्या