एक्स्प्लोर

Karnataka Election : कर्नाटकात 72.67 मतदान, आता प्रतिक्षा निकालाची

Karnataka Election 2023: कर्नाटकातील मतदान आता पूर्ण झालं असून 13 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. 

Karnataka Election : कर्नाटकातील निवडणुकीसाठी मतदान आता संपलं असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत 72.67 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सांयकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांनी मतदानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झालं. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे 13 तारखेला ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे. 

कर्नाटकमध्ये काँग्रेस 130-135 जागा जिंकेल, मल्लिकार्जुन खर्गेंना विश्वास

कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येईल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राज्यात 130 ते 135 जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकांना हे सरकार बदलायचे आहे. भ्रष्टाचार हटवून विकास घडवून आणणारे सरकार त्यांना हवे आहे, त्यामुळं काँग्रेस पक्ष सत्तेत यावा असे लोकांना वाटत असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने 130-135 जागा जिंकेल असं ते म्हणाले

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी राज्यभरातील एकूण 58,545 मतदान केंद्रांवर मतदान करण्याची सुविधा प्राप्त करुन देण्यात आली आहे. मतदानादरम्यान एकूण 75,603 बॅलेट युनिट (BU), 70,300 कंट्रोल युनिट (CU) आणि 76,202 व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) वापरण्यात येणार आहेत.

राज्यभरातील एकूण 5,31,33,054 मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. या मतदारांमध्ये 2,67,28,053 पुरुष मतदार तर 2,64,00,074 महिला मतदार आहेत. तसेच 4,927  इतक्या संख्येने इतर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात 11,71,558 तरुण मतदार आहेत, तर 5,71,281 शारीरिकदृष्ट्या अपंग आहेत आणि 12,15,920 मतदार हे 80 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत.

2,615 उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद होणार 

विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 2,615 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये 2,430 पुरुष तर 184 महिला उमेदवार आणि एक तृतीयपंथीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान पेटीत बंद होणार आहे. 

सलग दोन वेळा कोणताही पक्ष सत्तेत नाही

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय. हा समज मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली असून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या सिद्धरमय्या आणि डीके शिवकुमार या नेत्यांनी तोडीस तोड काम करत प्रचाराचा धडाका लावला. त्यामुळे आता जनता कुणाच्या पाठिशी राहते आणि कुणाला बाजूला सारते हे 13 मे रोजीच्या निकालावेळी समजेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
Embed widget