एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री, जी परमेश्वर उपमुख्यमंत्री!

राज्यपाल वजूभाई वाला यांनी एच डी कुमारस्वामी आणि जी परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंगळुरुत भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला.

बंगळुरु: जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. तर काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहतील. राज्यपाल  वजूभाई वाला यांनी एच डी कुमारस्वामी  आणि जी परमेश्वर यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. देशभरातील महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बंगळुरुत भव्य असा शपथविधी सोहळा पार पडला. औपचारिकरित्या आजपासून कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचं सरकार सत्तेवर आलं. काँग्रेसचे आमदार के. आर. रमेश कुमार हे विधानसभा अध्यक्ष असतील. मंगळवारी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अवघ्या 55 तासात भाजप नेते येडियुरप्पा यांनी शनिवारी 19 मे रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज कुमारस्वामी यांचा शपथविधीचा मुहुर्त ठरला होता. यासाठी देशभरातील नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधील, शरद पवार, ममता बॅनर्जींसह दिग्गजांचा समावेश होता. शपथविधीपूर्वी जोरदार पाऊस कर्नाटकात कुमारस्वामींच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीकडे देशाच्या नजरा लागल्या होत्या. मात्र आज बंगळुरुत जोरदार पाऊस आला. त्यामुळे या शपथविधी सोहळ्यात काहीसा व्यत्यय आला.  पण नंतर वातावरण निवळलं. दिग्गजांची हजेरी या शपथविधीसाठी देशातील विविध पक्षाच्या प्रमुखांसह दिग्गजांची उपस्थिती होती. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव बसपा अध्यक्ष मायावती सपा नेते अखिलेश यादव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू कमल हसन या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केरळचे मुख्यमंत्री पी विजयन तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव एक लाख लोकांची बैठक व्यवस्था कुमारस्वामी यांनी देशभरातील नेत्यांना शपथविधीचं निमंत्रण दिलं होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे शपथविधी सोहळ्यासाठी तब्बल एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात आली होती. विरोधकांचं शक्तिप्रदर्शन आणि शपथविधी भाजपला एकजुटीचा इशारा देण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. त्यामुळेच कुमारस्वामी जेव्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा विरोधी पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. देशभरातील प्रमुख 17 विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, शरद पवार हे नेते तर होतेच, शिवाय इतर पक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. कसं असेल मंत्रिमंडळ?  कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकार स्थापन करणार आहे. काँग्रेसने विधानसभेच्या 78 तर जेडीएसने 38 जागा जिंकल्या. काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत, आपल्याकडे वळवलं. कुमारस्वामी मुख्यमंत्री असतील. तर काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद असेल. काँग्रेसने दलित नेते आणि कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष जी परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं  आहे. तर काँग्रेसचेच के आर रमेश हे विधानसभा अध्यक्ष असतील. 34 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात 22 मंत्री काँग्रेसचे असतील, तर 12 मंत्र्यांसह मुख्यमंत्रीपद जेडीएसकडे असेल. कोण आहेत कुमारस्वामी? एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत. हरदानहल्ली देवेगौडा कुमारस्वामी असे 58 वर्षीय कुमारस्वामींचे संपूर्ण नाव आहे. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना 'कुमारअण्णा' म्हणून ओळखले जाते. कुमारस्वामी यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत. जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या कुमारस्वामी यांनी 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या कालावधीत कर्नाटकच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. 1996 साली रामनगरा जिल्ह्यातील कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी होत, कुमारस्वामी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र 1998 साली याच मतदारसंघात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला. यावेळी त्यांचा डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर 1999 साली सथनौर मतदारसंघातून कुमारस्वामींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळीही ते पराभूत झाले. 2004 साली ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी कुणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसच्या धरम सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पुढे कुमारस्वामी आपले समर्थक आमदार घेऊन सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर कुमारस्वामींनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली आणि स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र भाजपसोबतची सत्ताही फार काळ टिकली नाही आणि त्या सरकारमधूनही ते बाहेर पडले. खासदार, आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते या संसदीय पदांसोबत त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. ते जनता दल (सेक्युलर) पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. कुमारस्वामींनी कोणती पदं भूषवली आहेत? 1996 : 11 व्या लोकसभेत ते निवडून गेले. 2004–08 : कर्नाटक विधानसभेत ते आमदार म्हणून निवडून गेले. फेब्रुवारी 2006 - ऑक्टोबर 2007 : कर्नाटकचे मुख्यमंत्री 2009 : 15 व्या लोकसभेत निवडून गेले. 31 ऑगस्ट 2009 : ग्रामीण विकास समितीचे सदस्या 15 ऑक्टोबर 2009 : अन्न व्यवस्थापन समितीचे सदस्या 31 मे 2013 : कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते संबंधित बातम्या  कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?   कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार   कर्नाटकच्या राज्यपालांनी पदाची प्रतिष्ठा ठेवत राजीनामा द्यावा : शरद पवार   येडियुरप्पा : तेव्हा सात, आता अडीच दिवसाचे मुख्यमंत्री!   शपथविधी ते येडियुरप्पांचा राजीनामा, 55 तासात नेमकं काय घडलं?   फडणवीसांनाही सिद्ध करावं लागलं होतं बहुमत, राष्ट्रवादी मदतीला धावली होती! 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार? वरचढ कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karjat Jamkhed Assembly Election Result : कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार पोस्टल मतदानात आघाडीवर, सर्व अपडेटस एका क्लिकवर
कर्जत जामखेडमध्ये कांटे की टक्कर? रोहित पवार अन् राम शिंदे कोण बाजी मारणार?
Maharashtra Assembly Election Results 2024 : पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
पोस्टल मतदानात इस्लामपुरात जयंत पाटील, कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आघाडीवर, मुश्रीफ पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Results 2024 : भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
भाजपची मुसंडी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, सुरुवातीचे कल हाती
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
मोठी बातमी: राज्यातील मतमोजणीचा पहिला कल हाती, पोस्टल मतांमध्ये कोणाची बाजी?
Maharashtra Assembly Election Results 2024 : उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
उद्धव ठाकरेंच्या 94 शिलेदारांपैकी किती जणांनी उधळला विजयाचा गुलाल? वाचा एका क्लिकवर
Amit Thackeray vs Sada Sarvankar: मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
मोठी बातमी: माहीम विधानसभा मतदारसंघातून अमित ठाकरे आघाडीवर; सर्व अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
पवार, ठाकरे, देशमुख, राणे, शेलार बंधू मैदानात; बारामतीतही लक्षवेधी लढत; कुठून कोण जिंकलं, कोण हरलं?
Solapur vidhansabha results 2024 : सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
सोलापूर जिल्ह्यात माढा, बार्शी, सांगोल्यात चुरशीची लढत; तुमच्या मतदारसंघात कोण जिंकलं, कोण पराभूत?
Embed widget