एक्स्प्लोर
हवाई हल्ल्यामुळे पुन्हा मोदींची हवा, लोकसभेसाठी फायदा होणार, येदियुरप्पांचे वक्तव्य
सत्ताधारी पक्षाने आत्मचिंतन करावे असा आरोप होत असतानाच कर्नाटक भाजप अध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी याा हल्ल्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाची लाट पुन्हा तयार झाली आहे. याचा पक्षाला येणाऱ्या लोकसभेत फायदा होणार आहे, असे वक्तव्य केले आहे.
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर विरोधी पक्षांकडून भाजपवर या घटनेचा राजकीय पोळी भाजण्यासाठी उपयोग केला जात असल्याचा आरोप केला गेला. सत्ताधारी पक्षाने आत्मचिंतन करावे असा आरोप होत असतानाच कर्नाटक भाजप अध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी या हल्ल्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाची लाट पुन्हा तयार झाली आहे. याचा पक्षाला येणाऱ्या लोकसभेत फायदा होणार आहे, असे वक्तव्य केले आहे.
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक भाजप अध्यक्ष बीएस येदियुरप्पा यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर भारताने अचानक केलेल्या हल्ल्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाची लाट पुन्हा तयार झाली आहे. याचा पक्षाला येणाऱ्या लोकसभेत फायदा होणार असून कर्नाटकमध्ये 28 पैकी 22 जागांवर भाजपला विजय मिळेल, असे ते म्हणाले.
येदियुरप्पा म्हणाले की, दिवसेंदिवस भाजपची लाट निर्माण होत आहे. पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्याच्या निर्णयाने येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होईल. यामुळे युवकांमध्ये जोश भरला आहे. यामुळे कर्नाटकात भाजपला 22 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
वायुदलाच्या 12 लढाऊ मिराज विमानांनी 21 मिनिटे पाकिस्तानात शिरून जैश ए मोहम्मदचा अतिरेकी अड्डा उद्ध्वस्त करून 350 अतिरेक्यांना कंठस्नान घातले. त्यांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो. मात्र जवानांच्या शौर्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षांनी घेऊ नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. ठाकरे यांच्यासह देशाभरातून अनेक नेत्यांनी श्रेय घेण्यावरुन टीका केली आहे.
VIDEO | काश्मीरच्या कृष्णाघाटीमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन | एबीपी माझा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement