एक्स्प्लोर

सुप्रीम कोर्टात पहाटे पाचपर्यंत सुनावणी, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील!

सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला.

कर्नाटक विधानसभा निवडणूक नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा वाद थेट सुप्रीम कोर्टात पोहोचल्यानंतर, कोर्टाने मध्यरात्री ऐतिहासिक सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. त्यामुळे बी एस येडियुरप्पा हे कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेणार आहेत. मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदिल दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे. मध्यरात्री सुनावणी येडियुरप्पांच्या शपथविधीला विरोध करत काँग्रेस-जेडीएसने थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली. राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. कोर्टात रात्री पावणे दोन ते तब्बल पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली.  एखाद्या पक्षाला सत्तास्थापनेचं निमंत्रण देणं राज्यपालांचा विशेषाधिकार आहे, असं म्हणत कोर्टानं यात हस्तक्षेपास नकार दिला. सुप्रीम कोर्टानं येशपथविधी रोखण्यास स्पष्टपणे नकार दिला. सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेत, पुढील सुनावणी उद्या सकाळी 10.30 वाजता ठेवली आहे. त्यामुळे येडियुरप्पांचा आज सकाळी 9 वाजता होणारा शपथविधी सोहळा पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्या. ए. के. सिक्री, न्या. अशोक भूषण आणि न्या. बोबडे या तीन सदस्यीय खंडपीठासमोर ही सुनावणी सुरु आहे. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी काँग्रेस-जेडीएसच्यावतीने खंडपीठासमोर आपली बाजू मांडली. तर भाजपाकडून मुकुल रोहतगी तर केंद्र सरकारच्यावतीनं वकिल तुषार मेहता यांनी सरकारची बाजू मांडली. कोर्टाने समर्थक आमदारांची यादी मागितली शपथविधी रोखण्यास नकार देऊन कोर्टाकडून भाजपला दिलासा मिळाला असला तरी भाजपचा मार्ग सुकर झाला असं नाही. कारण, कोर्टानं भाजपकडून समर्थक आमदारांची यादी मागितली आहे.  त्याबाबत उद्या पुन्हा साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे.  त्यामुळे भाजप बहुमताचा आकडा कशा पद्धतीनं जुळवणार हा ही एक प्रश्न आहे. कर्नाटकात बहुमताचा आकडा 112 इतका आहे. मात्र सध्या भाजपकडे 104 आणि एक अपक्ष असे एकूण 105 आमदारांचं संख्याबळ आहे.  कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल 2018 भाजप 104 काँग्रेस 78 जनता दल (सेक्युलर) 37 बहुजन समाज पार्टी 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 अपक्ष 1 काँग्रेसचं आंदोलन एकीकडे न्यायालयात सुनावणी सुरु झाली तर दुसरीकडे मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास नवी दिल्लीत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाविरोधात घोषणाबाजी करीत निषेध आंदोलन केलं. यावेळी मोदींचा पुतळाही जाळण्यात आला. आणि मोदी मुर्दाबादचे नारेही काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिले. कर्नाटकात सुरक्षा व्यवस्था कर्नाटकमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातल्या मुख्य शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. संपूर्ण शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.  तर येडियुरप्पा यांच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्थाही कडक तैनात कऱण्यात आली आहे.. संबंधित बातम्या  कर्नाटकात भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण   भाजपचं मन की बात आता 'धन की बात' झालं : काँग्रेस 

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Embed widget