Kargil Vijay Diwas : 'मां तेरी कसम'; लष्कराने वाहिली कारगिलच्या शहिदांना गाण्याच्या स्वरुपात श्रद्धांजली
Kargil Vijay Diwas : कारगिलच्या युद्धातील विजय हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण होता. या युद्धात मातृभूमीचे संरक्षण करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहेत.
नवी दिल्ली : येत्या 26 जुलैला कारगिलच्या 'विजय दिवसा'ला 22 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर लष्कराने शहीदांना श्रद्धांजली देताना, त्यांच्या बहादुरीला सलामी करताना एक गाणं समर्पित केलं आहे. या गाण्याच्या माध्यमातून लष्कराने 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील आपल्या हिरोंचे स्मरण केलं आहे.
कारगिल युद्ध ही भारताच्या इतिहातील एक महत्वाची घटना आहे. या युद्धात भारताने पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आणि विजय मिळवला. कारगिल युद्धात भारताने मिळवलेला विजय ही पाकिस्तानची भळभळती जखम आहे. भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे स्मरण म्हणून 26 जुलैला 'कारगिल विजय दिवस' साजरा केला जातो.
भारतीय लष्कराच्या नॉर्थन कमांडने या कारगिल विजय दिवसाबद्दल एक गाणं तयार केलं आहे. या गाण्याचे गायन हे गिरिक अमन या गायकाने केलं आहे. लष्कराच्या नॉर्थन कमांडने हे गाणं सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
#LtGenYKJoshi #ArmyCdrNC dedicates Kargil song #MaaTeriKasam, story of "Pride...Valour...Sacrifice" of #KargilWar heroes sung by @Girikaman.#IndiaSalutesKargilHeroes@adgpi@westerncomd_IA @SWComd_IA @IaSouthern @suryacommand@artrac_ia @easterncomd pic.twitter.com/JeaEndX6gd
— NorthernComd.IA (@NorthernComd_IA) July 21, 2021
या वर्षीच्या कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी लष्कराने एका कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच या कार्यक्रमाला तीनही दलांचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
#IndiaSalutesKargilHeroes In a solemn ceremony to sound the bugle of celebrations of #KargilVijayDiwas, the “Shaurya Band” of J&K joined @NorthernComd_IA at Udhampur & presented a musical evening full of patriotism & fervour of Nationalism to honour the heroes of Kargil War. pic.twitter.com/r8oYs9GeEn
— NorthernComd.IA (@NorthernComd_IA) July 22, 2021
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases : देशात कोरोना प्रादुर्भाव सुरुच, गेल्या 24 तासांत 41 हजार नवे कोरोनाबाधित, 507 रुग्णांचा मृत्यू
- Mumbai Maharashtra Rain : पावसाचं रौद्ररुप! राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, घरं पाण्यात, पुढील पाच दिवस सावध राहा...
- हिंदी महासागरात चीनच्या वर्चस्वाला शह मिळणार; भारताच्या 'मेगा-सबमरिन प्रोजेक्ट'साठी टेंडर जारी