एक्स्प्लोर

Coronavirus Cases : देशात कोरोना प्रादुर्भाव सुरुच, गेल्या 24 तासांत 41 हजार नवे कोरोनाबाधित, 507 रुग्णांचा मृत्यू

Coronavirus Cases Today : भारतातील कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या अद्यापही चार लाखांहून अधिक आहे. तर गेल्या 24 तासांत 41 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.

Coronavirus Cases Today : भारतात कोरोनाचा कहर अद्याप सुरुच आहे. पुन्हा एकदा 40 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी आरोग्यमंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 41383 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 507 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी बुधवारी 42,015 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. गेल्या 24 तासांत 38,652 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील सध्याची कोरोना स्थिती 

देशात कोरोनाबाधितांची सक्रिय रुग्णसंख्या चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 9 हजार लोकांना सध्या कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महामारीच्या सुरुवातीपासूनच आतापर्यंत तीन कोटी 12 लाख 57 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 18 हजार 987 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 4 लाख 29 हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. 

देशातील लसीकरणाची स्थिती 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 21 जुलैपर्यंत देशभरात 41 कोटी 78 लाख कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 22 लाख 77 हजार लसीचे डोस देण्यात आले. आयसीएमआरनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 45 कोटी 9 लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17.18 लाख कोरोना सॅम्पल्स टेस्ट करण्यात आल्या. ज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्के इतका आहे. 

देशाचा मृत्यूदर 1.31 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांहून अधिक आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 1.30 टक्के आहे. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात सातव्या स्थानी पोहोचला आहे. एकूण बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या स्थानी आहे. तर अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. 

राज्यात काल (बुधवारी) 8159  नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात काल 8 हजार 159 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 हजार 839 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 8 हजार 750 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. 

राज्यात काल 165 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  94 हजार 745 
रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (45), यवतमाळ (17), गोंदिया (55) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 566 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

धुळे, नंदूरबार या दोन जिह्यात काल एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. तर कोल्हापुरात सर्वाधिक 996 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,60,68,435 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 62,37,755 (13.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5,51,521 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,795 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

मुंबईत गेल्या 24 तासात 435 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 435 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 560 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,08,214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,020 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1097 दिवसांवर गेला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Embed widget