एक्स्प्लोर
VIDEO: स्वच्छता अभियानासाठी अभिनेत्री कंगनाचा पुढाकार

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानाला साथ देण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनावतनं पुढाकार घेतला आहे. 'डोंट लेट हर गो' या नावानं तयार केलेल्या शॉर्ट फिल्ममध्ये कंगना रनावत मुख्य भूमिकेत आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये कंगनाला लक्ष्मीच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. परिसरात साफसफाई ठेवली तर घरातही लक्ष्मी नांदेल, असा संदेश कंगनानं या व्हिडिओतून दिला आहे. प्रदीप सरकार हे या शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शक आहेत. या शॉर्ट फिल्मला बिग बी अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे.
आणखी वाचा























