Kamya Punjabi : 'कोणाच्या बापाला घाबरत नाही'; काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काम्या पंजाबीचा डॅशिंग अंदाज
Kamya Punjabi in Bharat Jodo Yatra : टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाली आहे.
![Kamya Punjabi : 'कोणाच्या बापाला घाबरत नाही'; काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काम्या पंजाबीचा डॅशिंग अंदाज kamya punjabi join bharat jodo yatra with rahul gandhi actress express her experience with congress mp marathi news Kamya Punjabi : 'कोणाच्या बापाला घाबरत नाही'; काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या काम्या पंजाबीचा डॅशिंग अंदाज](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/06/b1e442c7de9182b6b686d094b2f522fc1673007607618358_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kamya Punjabi in Bharat Jodo Yatra : टेलिव्हिजन अभिनेत्री काम्या पंजाबी (Kamya Punjabi) काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागी झाली आहे. या यात्रेदरम्यानचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. राहुल गांधींच्या या प्रवासात काम्या पंजाबी युपीच्या वाटेवर सामील झाली आहे. गेल्या वर्षी काम्यानेही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि पक्षाप्रती आपली निष्ठाही व्यक्त केली होती.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काम्याने या प्रवासात सामील होण्यामागचे ध्येय सांगितले. यावेळी काम्या म्हणाली, "भारत जोडो यात्रा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मला माहित आहे की लोक माझ्या भारत जोडो यात्रेतील सहभागावर प्रश्न विचारतील."
ती पुढे म्हणाली, "बर्याच लोकांना या यात्रेत सामील व्हायचे आहे, परंतु ते सहभागी होण्यास घाबरतात. त्यांना भीती वाटते की या यात्रेत सामील झाल्याने ते सामाजिक तणाव, समस्या आणि विशेषतः सोशल मीडिया ट्रोलिंगला सामोरे जातील." मात्र, काही लोक या यात्रेत सहभागी झाले आणि त्यांचा आवाज बुलंद केला.
पाहा व्हिडीओ :
आओ मिलकर जोड़े अपना भारत 🖖 #BharatJodoyarta @RahulGandhi @priyankagandhi https://t.co/ikiJNWp9Qr
— Kamya Shalabh Dang (@iamkamyapunjabi) January 4, 2023
भारत जोडो यात्रेचा अनुभव कसा होता?
काम्या पंजाबी म्हणाली, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल गांधी सगळ्यांशी बोलतात. लोक त्यांना आपलं मानतात. 'मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही'. राहुल गांधींना पाठिंबा द्यायला मी घाबरत नाही.' या दरम्यान राहुलजींशी मी खूप संवाद साधला. तसेच, त्यांनीही भेटून खूप आनंद झाल्याचे सांगितले."
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा 22 सप्टेंबर 2022 रोजी तामिळनाडूतून झाली. तमिळनाडूपासून सुरू होऊन अनेक राज्यांतून त्यांनी दिल्लीच्या पलीकडे प्रवास सुरू ठेवला, हा प्रवास काश्मीरपर्यंत सुरू राहणार आहे. राहुल गांधींची यात्रा पुढे पंजाब मार्गे जम्मू आणि शेवटी श्रीनगरमध्ये पोहोचणार आहे. प्रजासत्ताक दिनाला यात्रा काश्मीरमध्ये असेल. देश जोडताना राहुल गांधींसमोर काँग्रेसच्या नेत्यांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचंही आव्हान आहे. यात्रा सुरु असतानाच हिमाचलमध्ये विजयी झालेल्या काँग्रेसने गुजरातमध्ये सपाटून मार खाल्ला आहे. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये नवचैतन्य आणण्याचं आव्हान राहुलसमोर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Amruta Fadanvis : "आज मैं मूड बना लिया"; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)