Justice S. kathawala : पहाटे साडेतीन वाजेपर्यंत न्यायदानाचे काम करणारे न्या. शाहरुख काथावाला निवृत्त
Justice SJ Kathawalla : न्यायमूर्ती काथावाला यांनी कोणताही ब्रेक न घेता एकाच दिवशी तब्बल 120 प्रकरणांवर सुनावणी केली होती.
मुंबई : न्यायदानाच्या कामात स्वत:ला झोकून देण्यासाठी प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आज सेवानिवृत्त झाले. तब्बल 14 वर्ष केलेल्या न्यायदानानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक वास्तूत न्यायमूर्ती काथावाला यांना सहकारी न्यायमूर्ती, वकील आणि कर्मचारी वर्गाकडून सन्मानात निरोप देण्यात आला. 2018 साली एका दिवशी साडे सतरा तास कोर्टाचं कामकाज पहाटे साडेतीन वाजेपर्यंत चालवत न्या. काथावालांनी रचला इतिहास होता.
मी गेली 14 वर्षे न्यायदानाचे काम केले आणि या काळात न्यायमूर्ती म्हणून घेतलेल्या शपथेला अनुसरुन प्रामाणिकपणे काम केलं असं न्या. शाहरूख काथावाला म्हणाले.
पहाटे साडेतीन पर्यंत काम सुरू
न्यायमूर्ती शाहरूख काथावाला हे जास्तीत जास्त वेळ न्यायालयीन सुनावणीचे काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. मे 2018 मध्ये, सुट्टीच्या एक दिवस आधी, न्यायमूर्ती काथावाला यांनी कोणताही ब्रेक न घेता एकाच दिवशी तब्बल 120 प्रकरणांवर सुनावणी केली होती. या दिवशी त्यांनी पहाटे साडेतीन वाजेपर्यंत काम केलं होतं.
कोरोनाकाळात उन्हाळी सुट्टीमध्ये काम
कोरोना महामारीमुळे उच्च न्यायालयाच्या सुनावण्यांवरही निर्बंध आले होते. केवळ तातडीच्या आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिले होते. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं मॅरेथॉन कामकाज केलं होतं. बुधवारी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं 19 मे 2021 रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी सुरु केलेलं ऑनलाईन कामकाज रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी संपवलं. पूर्वीपासूनच मॅरेथॉन कामकाजासाठी प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती शाहरूख काथावाला उन्हाळी सुट्टीतरी रेकर्डब्रेक सुनावणी केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.
कोण आहेत न्या. शाहरूख काथावाला?
न्या. शाहरूख काथावाला यांनी मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी पूर्ण केलं. 1985 साली त्यांनी वकील म्हणून कामाला सुरुवात केली. 18 जुलै 2008 साली मुंबई उच्च न्यायालयातील अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून त्यांनी पदभार सांभाळला. त्यानंतर 15 जुलै 2011 रोजी त्यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या: