(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CJI NV Ramana | न्यायमूर्ती एनव्ही रमणा आता देशाचे नवे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ
देशाचे 48 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून न्यायमूर्ती एनव्ही रमणा (NV Ramana) यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना शपथ दिली.
नवी दिल्ली : देशाचे पुढील सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नथालापती व्यंकट उर्फ एनव्ही रमणा यांनी शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना राष्ट्रपती भवन येथे सकाळी 11 वाजता सरन्यायाधीश पदाची शपथ दिली. या प्रसंगी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यासोबत सर्वोच्च न्यायालयातील अनेक न्यायमूर्ती उपस्थित होते. माजी सरन्यायाधीश शरद बोबडे हे 23 एप्रिलला निवृत्त झाले आहेत. सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांचा कार्यकाल पुढचे 16 महिने असणार आहे.
Justice N.V. Ramana sworn in as the Chief Justice of the Supreme Court of India at Rashtrapati Bhavan today. pic.twitter.com/eSeccJOH8R
— President of India (@rashtrapatibhvn) April 24, 2021
एनव्ही रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील कृष्णा या जिल्ह्यात पोन्नावरम या गावात झाला. मृदुभाषी स्वभाव असलेल्या एनव्ही रमणा यांनी 1983 साली आपल्या वकिलीची सुरुवात केली. त्यांनी केंद्र सरकारसाठी अतिरिक्त स्थायी वकील तसेच केंद्रीय प्रशासनिक अधिकरणामध्ये रेल्वेसाठी स्थायी वकील म्हणून काम केलंय. 2000 साली ते आंध्र प्रदेशच्या स्थायी न्यायालयाचे न्यायाधीश बनले.
एनव्ही रमणा यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये भाग घेतला. 2013 साली त्यांची नियुक्ती दिल्ली उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून झाली. 2014 साली रमणा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून काम सुरु केलं.
गेल्या काही वर्षात एनव्ही रमणा यांनी अनेक महत्वपूर्ण खटल्यांचा निकाल दिला. त्यामध्ये जम्मू काश्मिरला इंटरनेट सुविधा पुन्हा देण्याचा निर्णयाचा समावेश होता. सरन्यायाधीशांचे कार्यालय माहितीच्या अधिकाराच्या कायद्याखाली आणण्याचा जो निर्णय देण्यात आला, तो निर्णय देणाऱ्या बेन्चमध्ये एनव्ही रमणा यांचा समावेश होता.
महत्वाच्या बातम्या :