एक्स्प्लोर

न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर भारताचे पहिले शीख सरन्यायाधीश

नवी दिल्ली : न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांची भारताचे 44 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी न्यायमूर्ती जेएस खेहर यांना राष्ट्रपती भवनात शपथ दिली. न्यायमूर्ती टी एस ठाकूर मंगळवारीच सरन्यायाधीश पदावरुन निवृत्त झाले होते. न्यायमूर्ती खेहर हे देशाचे पहिले शीख सरन्यायाधीश आहे. न्यायमूर्ती खेहर यांचा कार्यकाळ आठ महिन्यांचा असेल. 28 ऑगस्ट 2017 पर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश म्हणून जबाबदारी पार पाडतील. खेहर यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले होते. कोण आहेत न्यायमूर्ती जेएस खेहर? 64 वर्षीय न्यायमूर्ती जेएस खेहर यांचं संपूर्ण नाव जगदीश सिंह खेहर आहे. खेहर हे अतिशय शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म पंजाबमध्ये झाला तर पंजाब विद्यापीठातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. सप्टेंबर 2011 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झाली. जेएस खेहर अतिशय कठोर प्रशासक असून त्यांना वेळेचा अपव्यय करणं आवडत नाही. वकिलांशीही ते कठोर वागतात. पूर्ण तयारीनिशी न आल्याने अनेक वकिलांना त्यांच्या तिखट शब्दाचा मार खावा लागला आहे. वकिलाने त्याची कागदपत्रे योग्यरित्या सादर न केल्याने सुनावणीदरम्यान खेहर कोर्टाबाहेर गेले होते. वकील म्हणून शानदार करिअर करणारे जेएस खेहर 1999 मध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले. 2010 मध्ये मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश पी डी दिनाकरन यांच्याविरोधात तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यायाधीशांच्या समितीत त्यांचा समावेश होता. त्यावेळी ते स्वत: कर्नाटक हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट

मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार

लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ

''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप

जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget