2024 साठी भाजपचा मेगाप्लॅन, जेपी नड्डांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना
जास्तीत जास्त बूथ पर्यंत पोहचायचे आहे. सुरुवातीला 70 हजार टार्गेट होतं माञ आपण 1 लाख 30 हजार बूथ पर्यत पोहचलो आहोत. अजुनही कमजोर बूथ ओळखून त्याठिकाणी काम वाढवा.
BJP National Executive Meeting: भाजपनं 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासंदर्भात आज दिल्ली दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये लोकसभा आणि विधानसभेबाबत अजेंड्यावर चर्चा झाली. त्याशिवाय देशातील विविद मुद्द्यांवर आणि पक्षातील संघटनात्मक मुद्द्यांवरी चर्चा झाली. बैठकीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी 2024 च्या मेगाप्लॅनबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत... दरम्यान, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, जेपी नड्डा आणि भाजपचे राज्य असणाऱ्या राज्यातील 12 मुख्यमंत्री आणि 5 उपमुख्यमंत्री, 35 केंद्रिय मंत्री, यांच्या सोबत जवळ्पास 350 नेते सहभागी होते. त्याशिवाय अनेक पदाधिकारीही उपस्थित होते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत पदाधिकऱ्यांना सूचना-
1) वर्ष 2023 विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे तात्काळ कामाला लागा. गुजरातमध्ये ज्या प्रकारे कष्ट घेऊन 150 जागा निवडून आणल्या आहेत. त्याच प्रकारे आता या वर्षी होणाऱ्या 9 विधानसभा निवडणुकांत वर्चस्व प्राप्त करायचे आहे. एक ही राज्य सत्ता जाता कामा नये. कार्यकर्त्यांनो कामाला लागा.
2) जास्तीत जास्त बूथ पर्यंत पोहचायचे आहे. सुरुवातीला 70 हजार टार्गेट होतं माञ आपण 1 लाख 30 हजार बूथ पर्यत पोहचलो आहोत. अजुनही कमजोर बूथ ओळखून त्याठिकाणी काम वाढवा.
3) 2024 मध्ये पुन्हा एकदा सत्ता मिळवायची आहे, त्यामुळे विधानसभा निवडणूका गांभीर्याने घ्या
4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली कामे सर्वसामान्य नागरीकांपर्यंत पोहचवा. गरीब कल्याण योजना, अन्न सुरक्षा योजना याबाबत माहिती द्या.
13 फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम -
रवि शंकर प्रसाद म्हणाले की, दयानंद सरस्वती यांच्या 200 व्या जयंतीनिमित्त दिल्लीमध्ये 13 फेब्रुवारी रोजी मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. दयानंद सरस्वती यांना आदर्शावर चालत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्याचं कार्य हातात घेतलेय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 220 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झालेय. न्यू इंडिया कार्य संस्कृती देशात सुरु झाली आहे.
भाजपचं काम सांगितलं -
रवि शंकर प्रसाद म्हणाले, '75 वर्षानंतर 'राजपथ'चं नाव बदलण्यात आलेय. आम्ही राजपथचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' केलं. आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी काशी कॉरिडोर, महाकाल लोक, केदारनाथचं पुनर्स्थापित केलं. त्याशिवाय राम मंदिराचं कामही अखेरच्या टप्प्यात आहे. ' ब्रिटनला मागे टाक भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. त्याशिवाय मोबाईल फोनची निर्मिती करणाऱ्यांमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात मेक इन इंडिया फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे जेपी नड्डा यांनी सांगितलं.