एक्स्प्लोर

Joshimath : जोशीमठची अशी अवस्था होण्यामागे नेमकं काय कारण? CSIRचे माजी महासंचालक शेखर मांडेंनी सांगितल्या महत्वाच्या गोष्टी

जोशीमठची ही अवस्था होण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत CSIR चे माजी महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना काही महत्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे. .

Joshimath Latest Updates: उत्तराखंडमधील जोशीमठ (Uttarakhand Joshi Math) सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेले आहेत. जोशीमठची ही अवस्था होण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत CSIR चे माजी महासंचालक डॉ शेखर मांडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना काही महत्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे. .

जोशीमठावर आलेल्या आपत्तीचं नेमकं कारण काय? नैसर्गिक कारणांसह मानवी हस्तक्षेप देखील याला जबाबदार आहे का? याबाबत त्यांना विचारलं असता डॉ मांडे म्हणाले की, जोशीमठ ज्या संकटाला तोंड देतंय त्याला ही दोन्ही कारणं जबाबदार आहेत. याबद्दल सांगताना डॉ शेखर मांडे म्हणाले, 1976 मध्ये मिश्रा कमिटीचा एक रिपोर्ट आला होता. त्यात असं सांगितलं गेलं होतं की तिथली मातीची गुणवत्ता ही फार चांगली नसल्यानं ते आपत्ती क्षेत्र आहे, तिथे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. तिथली माती ठिसूळ असल्याने भूस्खलन होणं साहजिक आहे. त्याचबरोबर मानवाने तिथे केलेली कामं ( Anthropogenic Activities ) बांधकाम हे देखील याला जबाबदार आहे. जोशीमठ प्राचीन भूस्खलन क्षेत्रात आणि पर्वताच्या तुटलेल्या एका तुकड्यावर, मातीच्या अस्थिर ढिगाऱ्यावर वसलंय. घरं, बांध बांधणे यामुळे जमीन ठिसूळ होते आणि सांडपाणी व्यवस्था  नसल्याने पाणी जमिनीत मुरत जातं आणि ज्यामुळे माती वाहून जाते, जमीन खाली धसते आणि तेच आपल्याला इथे बघायला मिळतंय.

Joshimath News collapsing due to innumerable development works Joshimath News: बेसुमार विकासकामांमुळे देवभूमी ढासळतेय? हिमालयाच्या संकेतातून धडा घेण्याची गरज

इथे पर्यटनाला प्रोत्साहन देऊ नये...

पर्यटनाला इथे जास्त प्रोत्साहन नाही दिलं तर जोशीमठ सारख्या स्थानांना मदत होऊ शकते. पर्यटनाला चालना दिली तर बांधकामं वाढणार, लोकसंख्या वाढणार आणि मग अशा आपत्ती येत राहणार, त्यापेक्षा प्रशासनाने इथे पर्यटनाला प्रोत्साहन देऊ नये. जोशीमठातील रहिवाशी यांच्यासाठी पर्यायी मार्ग शोधून त्यांना होणारा त्रास कमी करता येईल आणि त्यांचं विस्थापन करून सोय करता येईल, असंही मांडे म्हणाले. 

जोशीमठसारख्या भागांमध्ये अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी काय करता येईल? 

 मांडे म्हणाले की, आपण या भागाची जिऑलॉजी बघितली तर हिमालय हा तसा नवीन पर्वत आहे. हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करतात.काही दशलक्ष वर्षांपूर्वी युरेशियन प्लेट आणि इंडो-ऑस्ट्रेलियन प्लेट या दोन टेक्टोनिक प्लेट्स धडकल्यामुळे हिमालय पर्वत रांग तयार झाली. हिमालयाच्या जमिनीची गुणवत्ता आणि इतर भागांमधील मातीची गुणवत्ता वेगळी आहे, माती ठिसूळ आहे, हिमालयाच्या पायथ्याशी भूकंप येतात आणि ते येत राहणार कारण हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. जर आपण मानवी हस्तक्षेप बंद केला, बांधकाम कमी केलं आणि इथला विकासाचा आराखडा जर नीट तज्ज्ञांकडून प्लॅन केला तर हे कमी होऊ शकेल, असं ते म्हणाले.

पर्यटनाला चालना देताना आपण निसर्गाशी खेळ करतोय का?

 डॉ शेखर मांडे म्हणाले की, निसर्गाबरोबर राहून पर्यटनाला वाव द्यायला हवा, पर्यटनाला वाव देताना अतिरेक होऊ नये. गंगा, ब्रह्मपुत्रा, हिमालय इथे आपण बांधकाम करतो, ५-६ माजली हॉटेल बांधतो आणि त्याने निसर्गाचं नुकसान होतं. केंद्राच्या ग्रामीण विकास मंत्रालय आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय यांनी माहितीपट तयार केला आहे की आपत्ती प्रवण क्षेत्रांमध्ये बांधकाम कसं करायला हवं. आपण निसर्गाबरोबर राहून पर्यटनाला वाव दिला आणि प्रोत्साहन दिलं तर जास्त बरं पडेल, असं ते म्हणाले.

ही बातमी देखील वाचा

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget