एक्स्प्लोर

जोशीमठमधील 500 घरांना तडे, प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात, सोमवारी होणार सुनावणी

PIL On Joshimath Land Sinking: हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बद्रीनाथच्या वाटेवर असलेलं जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. हे शहर जणू जमिनीत खचत चाललंय.

PIL On Joshimath Land Sinking: हिमालयाच्या कुशीत वसलेलं, बद्रीनाथच्या वाटेवर असलेलं जोशीमठ सध्या एका भयानक संकटाला तोंड देतंय. हे शहर जणू जमिनीत खचत चाललंय. एकाचवेळी शहरातल्या पाचशेहून अधिक घरांना मोठे तडे गेलेत.. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेय. सोमवारी याच्यावर सुनावणी होणार आहे.  ज्योतिष्पीठमधील जगद्गुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती महाराज यांनी आज शनिवार (07 जानेवारी) या प्रकरणी आपल्या वकिलाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी सुनावणी होणार आहे.  

जोशीमठ..बद्रीनाथसाठीचं प्रवेशद्वार..भारत चीन सीमेवरचा लष्कराचा मोक्याचा तळ...पण हिमालयाच्या कुशीतलं हे गाव सध्या वेगळ्या कारणांनी हेडलाईन्समध्ये आहे...एकदोन नव्हे तर इथल्या 500 घरांना असे तडे गेलेत...या भेगा पण साध्या नाहीयत...सगळ्या शहरावर अशा वीतभर भेगा पडत जमीन फाटलीय..लोक भयभीत झालेत, रात्री मशाल मोर्चे काढतायत...घरापेक्षा रस्त्यावरच त्यांना तुलनेनं सुरक्षित वाटतंय..कशामुळे आलीय ही वेळ? 

खरंतर जोशीमठमधल्या या संकटाची पहिली चाहूल 1976 मध्येच दिली गेली होती. रस्ते, जलविद्युत प्रकल्प आणि शहर विकासाच्या नावाखाली अति केलंत तर जोशीमठमध्ये अशी स्थिती उद्भवू शकते याचा इशारा मिश्रा समितीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आला होता.

हिमालयातलं हे अख्खं शहर खचत का चाललंय? 

     उत्तराखंडमधल्या चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ वसलं आहे

     हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठीचं हे प्रवेशद्वार

     20 हजार लोकवस्तीच्या या गावात 500 घरांना अशा मोठ्या भेगा पडल्यात

     हिमालयाच्या दरडी कोसळणारी ही जागा, त्याच जागेवर काही वर्षांपूर्वी हे शहर वसलं

     गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या परिसरात जलविद्युत प्रकल्प, रस्ते रुंदीकरण आणि इतर बांधकामं वाढली

     चारधामसाठी हायवे रुंदीकरणाचं काम इथं सुरु आहे, जे सध्या स्थानिकांच्या विरोधामुळे थांबवलं गेलं

जोशीमठमध्ये 4 जानेवारीपासूनच परिस्थिती गंभीर बनत गेली. लोक रात्रीचे मशाल मोर्चे काढतायत..हायवेची कामं बंद पाडतायत..एनटीपीसी जे इथल्या जलविद्युत प्रकल्पांची कामं करतंय. त्यांच्या कार्यालयावर निदर्शनं करतायत. काल राज्य आणि केंद्र सरकारनंही याबाबत हालचाली सुरु केल्या..संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना स्थलांतरित करण्याची मोहीम सुरु झालीय...लष्कराचे चॉपर्स त्यासाठी तैनात ठेवले गेलेत.या संपूर्ण स्थितीबाबत काय करता येईल यासाठी केंद्र सरकारनंही तातडीनं समितीची घोषणा केलीय. पण यात सगळे सरकारीच लोक आहेत. अशा संकटात सरकारी धोरणांचं कडक परीक्षण व्हायचं असेल तर एखाद्या खासगी तज्ज्ञांनाही घ्यायला हवं होतं अशीही टीका होतेय. जोशीमठमधल्या या भेगा काही अचानक आलेल्या नाहीयत. याआधी निसर्गानं दिलेल्या अनेक इशाऱ्यांकडे केलेलं हे दुर्लक्ष आहे. 2021 मध्येही काही ठिकाणी भेगा पडल्याची उदाहरणं होती. त्यामुळे आता या संकटातून तरी काही ठोस धडा आपण घेतो का हे पाहावं लागेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget