एक्स्प्लोर

Joshimath Crisis : जोशीमठमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतेय; 800 हून अधिक इमारतींना तडे, 165 डेंजर झोन

Joshimath Landslide : जोशीमठमध्ये आतापर्यंत 800 हून अधिक इमारतींना तडे गेले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे.

Joshimath Land Sinking : हिमालयाच्या कुशीत वसलेलं जोशीमठ (Joshimath) सध्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जात आहे. उत्तराखंडच्या (Uttarakhand) जोशीमठमधील जमीन अद्यापही खचताना (Land Sinking) पाहायला मिळत आहे. जमीन, घरे, इमारतींना तडे जाण्याचे सत्र सुरुच आहे. जोशीमठमध्ये आतापर्यंत 800 हून अधिक इमारतींना तडे गेले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतं चालली आहे. सोमवारी एका वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, सोमवारपर्यंत जोशीमठमधील 849 इमारतींना तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचली आहे आणि जमिनीलाही तडे गेले आहे. त्यामुळे येथील नागिरकांना गंभीर समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

जोशीमठमध्ये 849 इमारतींना तडे

काही दिवसांपूर्वी इस्रोनं (ISRO) जारी केलेल्या जोशीमठच्या सॅटेलाईट इमेजेसमध्ये जोशीमठ दिवसेंदिवस कसं खचतंय, हे स्पष्ट होतंय. कार्टोसॅट-2एस उपग्रहावरून ही छायाचित्रं घेण्यात आली आहेत. एका रिपोर्टनुसार, जोशीमठमध्ये आतापर्यंत 849 इमारतींना तडे गेल्याचे आढळून आले आहे. यामधील 165 इमारती डेंजर झोनमध्ये आहेत. तसेच आतापर्यंत 237 कुटुंबांमधील सुमारे 800 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्यापासून जमीन खचण्याला सुरुवात

अद्यापही जोशीमठ खचतंय. डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून जोशीमठमध्ये खचण्याच्या घटनांना सुरुवात झाली. उत्तराखंडमधील चमौली जिल्ह्यात 6150 फूट उंचीवर जोशीमठ वसलं आहे. हिंदूंसाठी पवित्र चारधामपैकी एक धाम बद्रीनाथसाठी जोशीमठ हे प्रवेशद्वार आहे. या गावात 20 हजार लोकवस्ती आहे.

190 कुटुंबांना मिळाली नुकसान भरपाई

सचिव रणजित सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'उत्तराखंड सरकारकडून 190 बाधित कुटुंबांना मदत म्हणून 2.85 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. आतापर्यंत 237 कुटुंबांतील 800 सदस्यांना तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने इमारतींवर क्रॅक मीटर बसवले असून त्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले आहे. आतापर्यंत 400 घरांच्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यात आले आहे.

पाणी गळती कमी झाली

रणजित सिन्हा म्हणाले की, वाडिया इन्स्टिट्यूटने जोशीमठमध्ये तीन भूकंप केंद्रे शोधली आहेत, यावरून अधिक माहिती मिळवली जात आहे. जमिनीतून पाण्याची गळती कमी झाली आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 2 जानेवारीपासून जेपी कॉलनीत पाणी गळती सुरु आहे. आधी प्रतिमिनिट 540 लिटर पाण्याची गळती होती. पण आता हे प्रमाण कमी झाले असून आता प्रति मिनिट 163 लिटर गळती होत आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Osman Hadi Death: उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेश पुन्हा पेटला; तो नेमका होता तरी कोण? शेजारच्या देशात नेमकं काय चाललंय??
Epstein File: आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
आलिशान आयलँड, 5 स्टार बेडरुम, तरुणींच्या छातीवर, मांडीवर मेसेज अन् रशियन मुलींचे रेटकार्ड सुद्धा! एपस्टीन फाईलमधील 15 धडकी भरवणारे फोटो
Pune News: पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
पिंपरी चिंचवडकरांचा निर्लज्जपणाचा कळस! बेशिस्त वाहन चालकांना परदेशी नागरिकाने रोखले, व्हायरल व्हिडीओ पोलिसांची पोलखोल!
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
कोण तिघींसोबत, कोण म्हणतोय ती 1 हजार डाॅलर मागत आहे! एपस्टीनच्या अय्याशीच्या अड्ड्यातून नव्या 68 फोटोंनी जगभरात धुमाकूळ! बिल गेट्स सुद्धा नको त्या अवस्थेत
Pune Shivsena: रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
रविंद्र धंगेकरांच्या मागणीला एकनाथ शिंदेंनी केराची टोपली दाखवली? पुण्यात शिवसेना 35-40 जागांवर लढण्यास तयार, रात्री महत्त्वाची बैठक
Omraje Nimbalkar: एवढा उन्माद येतो कुठून? तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
तुळजापुरातही बीड प्रमाणे 'आका' संस्कृती आणायचीय का? सरपंच देशमुखांच्या हत्याप्रमाणेच हत्या करायची होती का? गोळीबार प्रकरणानंतर ओमराजे निंबाळकरांचा संतप्त सवाल
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
'धुरंधर'मध्ये रणवीरला टक्कर देणारा 'हँडसम हंक', रातोंरात कित्येक मुलींचा क्रश बनला, आता म्हणतोय, 'मला पाकिस्तानातूनही...'
Parli Crime : परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
परळीतील औष्णिक विद्युत केंद्रात चोरट्यांचा धुमाकूळ; चक्क दुचाकीसह ऑटो घेऊन आत शिरले; विद्युत केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
Embed widget