एक्स्प्लोर

जेएनयूत पुन्हा लाल झेंडा, ABVP चा दारुण पराभव

AISA च्या गीता कुमारी आणि सिमोन झोया यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर SFI च्या दुग्गिराला श्रीकृष्ण हिची सचिवपदी आणि शुभांशु सिंग याची सहसचिव पदी निवड झाली.

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये झालेल्या विद्यार्थी युनियनच्या निवडणुकीत पुन्हा लाल झेंडा फडकला. या निवडणुकीत पुन्हा एकदा डाव्या आघाडीच्या पॅनलने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना अभाविपवर सहज विजय मिळवला. विद्यार्थी युनियनच्या अध्यक्षपदासाठी युनायटेड लेफ्ट आणि अभाविप यांच्यात मोठी चुरस होती. AISA, SFI आणि DSF या तीनही डाव्या संघटनांनी यावर्षी एकत्र निवडणूक लढवली होती. यावेळी AISA च्या गीता कुमारी आणि सिमोन झोया यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर SFI च्या दुग्गिराला श्रीकृष्ण हिची सचिवपदी आणि शुभांशु सिंग याची सहसचिव पदी निवड झाली. AISA च्या गीता कुमारीने 464 मतांच्या अंतराने विजय मिळवला. तिला 1506 तर अभाविपच्या निधी त्रिपाठीला 1042 मतांवर समाधान मानावं लागलं. गीता एम.फिलची विद्यार्थीनी आहे. काँग्रेसची विद्यार्थी संघटना NSUI ची कामगिरी या निवडणुकीत अत्यंत निराशाजनक होती. कारण NSUI च्या उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मतं मिळाली. अध्यक्षपदावर तिन्हीही मुख्य संघटनांनी विजय मिळवल्यानंतर चौथ्या स्थानावर अपक्ष उमेदवार फारुख आलम राहिला. त्याने वाद-विवाद भाषणामध्ये सर्व संघटनांच्या उमेदवारांवर मात केली. दरम्यान आमचा सामना करण्यासाठी तीन संघटनांना एकत्र यावं लागलं. निकालावरुन हे स्पष्ट होतं की अभाविप जेएनयूतील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे, असं अभाविपने म्हटलं आहे. या निकालाचा परिणाम दिल्ली विद्यापीठ निवडणुकीतही दिसण्याची शक्यता आहे. कारण तिथे अभाविपसमोर NSUI चं आव्हान असेल.

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Mithilesh Desai Meets Narendra Modi: शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
शरद पवारांनी रत्नागिरीच्या फणसकिंगला नरेंद्र मोदींना भेटवले; मोबाईलमध्ये काय दाखवले, कोण आहेत मिथिलेश देसाई?
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget