Jharkhand ED Raids : जिकडे तिकडे फक्त नोटाच नोटा; झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरी नोटा, निवडणुकीच्या धामधुमीत ईडीची मोठी छापेमारी
Massive Cash Recovered By ED: झारखंडमध्ये ईडीच्या वतीनं मोठी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीत मोठी रोकड जप्त करण्यात आली.
Jharkhand ED Raids : रांची : अंमलबजावणी संचालनालयानं (ED) रांची (Ranchi), झारखंडमधील अनेक ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त (Massive Cash Recovered By ED) केली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम (Rural Development Minister Alamgir Alam) यांचे स्वीय सचिव संजीव लाल (Sanjiv Lal) यांच्या नोकराच्या घरातून ईडीनं मोठी रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही रोकड 20 ते 30 कोटींच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड एवढी मोठी आहे की, ईडी अधिकाऱ्यांनी आता नोटा मोजण्याच्या मशीन मागवल्या आहेत.
झारखंडमध्ये ईडीच्या वतीनं मोठी छापेमारी करण्यात आली आहे. ईडीच्या छापेमारीत मोठी रोकड जप्त करण्यात आली. झारखंडचे ग्रामविकासमंत्री आलमगीर आलम यांचे स्विय सहायक संजीव लाल यांच्या सहायकाकडून रोकड जप्त केल्याची ईडीची माहिती मिळत आहे. याप्रकरणी ईडीनं अटकेची कारवाई करत झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना ताब्यात घेतलं आहे. झारखंडमधील ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमबजावणीत झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी ईडीकडून तपास सुरू आहे. याचदरम्यान ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
#WATCH | Jharkhand: Huge amount of cash recovered from household help of Sanjiv Lal - PS to Jharkhand Rural Development minister Alamgir Alam - in ED raids at multiple locations in Ranchi in Virendra Ram case.
— ANI (@ANI) May 6, 2024
ED arrested Virendra K. Ram, the chief engineer at the Jharkhand… pic.twitter.com/1yoBFRvaLa
अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीनं फेब्रुवारी 2023 मध्ये झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के यांच्यावर काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ईडीच्या वतीनं झारखंड ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, छापेमारीत जप्त करण्यात आलेली रोकड काळ्या पैशाचा भाग असल्याचं ईडीचं मत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये प्रचार करत असताना त्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यांच्या रॅलीनंतर काही दिवसांनी ही कारवाई झाली असून त्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडली आहे.
कोण आहे आलमगीर आलम?
आलम हे पाकूर विधानसभेचे चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामविकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम 20 ऑक्टोबर 2006 ते 12 डिसेंबर 2009 पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. 2000 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.