(Source: Poll of Polls)
Jharkhand Mine Collapsed: झारखंडमध्ये बेकायदेशीर कोळसा खाणीत अपघात; तिघांचा मृत्यू, तर अनेकजण अडकल्याची भीती
Jharkhand Mine Collapsed: झारखंडमधील धनबाद शहरामध्ये अवैध खाण कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच यामध्ये अनेक जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे.
Jharkhand Mine Collapsed: झारखंडच्या (Jharkhand) धनबाग या शहरामध्ये सकाळी साडेदहाच्या सुमारास बेकायदेशीर कोळसा खाण (Illegal Mine) कोसळल्याची घटना घडली असून यामध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच यामध्ये अनेक जण अडकल्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या आणि अडकलेल्या एकूण माणसांची संख्या अद्याप समजू शकलेली नाही. तसेच घटनास्थळावर सध्या बचाव कार्य देखील सुरु आहे.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा ही खाण कोसळली तेव्हा अनेक कामगार या खाणीमध्ये काम करत होते. तसेच स्थानिक लोकांच्या मदतीने तीन जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तसेच इतर जखमी लोकांना देखील तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
झारखंडमधील धनबाग या शहरामध्ये बेकायदेशीरपणे कोळसा खाणीचे काम सुरु होते. नेहमीप्रमाणे येथील स्थानिक लोक कोळश्याचे उत्खनन करण्यासाठी या कोळसा खाणीजवळ गेले. त्यावेळी कोळसा कापताना वरुन एक कोळशाचा दगड आणि मातीचा ढिगारा कोसळला. या ढिगाऱ्याखाली 15 लोकं अडकल्याचं म्हटलं जात आहे. यामधील तीन लोकांचा मृत्यू झाला आहे.
या दुर्घटनेमधील मृतांमध्ये एक महिला, एक पुरुष आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मशिनद्वारे खाणीतून डेब्रिज काढण्याचे काम बीसीसीएल या कोळसा कंपनीकडून केले जात होते. तसेच मशिनच्या साहाय्याने ढिगारा बाजूला सारण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरुप बाहेर काढण्याचे काम देखील सुरु असल्याची माहिती मिळत आहे. तसेच जखमी लोकांवर स्थानिक शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेमध्ये आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं आता गरजचे ठरणार आहे.
At least three dead, many feared trapped in illegal coal mine collapse in Jharkhand's Dhanbad. pic.twitter.com/yqlNIZIHFN
— Press Trust of India (@PTI_News) June 9, 2023
VIDEO | Visuals from the site in Jharkhand's Dhanbad where at least three people died and many feared trapped after an illegal coal mine collapsed earlier today. pic.twitter.com/ak05QjHouX
— Press Trust of India (@PTI_News) June 9, 2023