एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डॉक्टरांचा असंवेदनशीलतेचा कळस, तुटलेल्या पायाची रुग्णाला उशी
झांसीच्या शासकीय मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी अपघातात जखमी बस क्लीनरच्या उपचारावेळी त्याचाच तुटलेला पाय उशी म्हणून दिल्याची घटना समोर आली आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशातील झांसीच्या शासकीय मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांचा असंवेदनशीलतेचा कळस पाहायला मिळत आहे. कारण, अपघातात जखमी बस क्लीनरच्या उपचारावेळी त्याचा तुटलेला पाय उशी म्हणून दिल्याची घटना समोर आली आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या प्रकरणी दोन डॉक्टरांसह दोन परिचारिका (नर्स)वर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपॅडिक्स)च्या विरोधातही कारवाईचे आदेश दिले आहेत.
अधिक माहितीनुसार, झांसीमधील एका शाळेच्या स्कूल बसवर घनश्याम (वय 25) नावाचा तरुण क्लीनर काम करत होता. शनिवारी बसमधून विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना, बसचा अपघात झाला. या अपघातात सहा विद्यार्थी जखमी झाले. तर घनश्यामचा पाय तुटला. त्याला उपचारांसाठी झांसीच्या मेडिकल कॉलेजमध्ये इमरजेंसी वॉर्डात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना, डॉक्टरांनी त्याचा तुटलेला पाय कापून त्याच्याच मानेखाली उशी म्हणून दिल्याचा आरोप होत आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
तसेच राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या आदेशावरुन सिनियर रेजीडेण्ट (ऑर्थोपॅडिक्स) डॉ. आलोक अग्रवाल, ईएमओ डॉ. महेंद्र पाल सिंह, सिस्टर इंचार्ज दीपा नारंग आणि शशी श्रीवास्तव आदींना तात्काळ निलंबित केलं आहे. तसेच, सहाय्यक प्राध्यापक (ऑर्थोपॅडिक्स) डॉ. प्रवीण सरावगी यांच्याविरोधातही कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement