JEE Main 2021 : जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
JEE Main 2021 Exam : जेईई परीक्षेच्या चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 26, 27, 31 ऑगस्ट, 1 आणि 2 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार आहे.
मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीच्या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्रक जारी करण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. तसेच चौथ्या सेशनच्या तारखांमध्ये थोडा बदल करण्यात आला असून त्या आता 26 , 27 , 31 ऑगस्ट, 1 सप्टेंबरआणि 2 सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार आहे.
जेईई मेन्सच्या चौथ्या सेशनसाठीचे ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 20 जुलैपर्यंत सुरु आहे. इच्छुक विद्यार्थी jeemain.nta.nic.in. या संकेतस्थळावर अर्ज करु शकतात.
Accordingly, the JEE(Main) 2021 session 4 will now be held on 26th, 27th & 31st August, and on 1st and 2nd September, 2021. A total of 7.32 lakh candidates have already registered for JEE(Main) 2021 session 4.
— Dharmendra Pradhan (@dpradhanbjp) July 15, 2021
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन्स परीक्षा फेब्रुवारी,मार्च, एप्रिल, मे या चार सेशनमध्ये घेण्याचा निर्णय झाला होता. त्यापैकी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील परीक्षा पूर्ण झाल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्याच्या म्हणजेच तिसऱ्या आणि चौथ्या सेशनच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता या परीक्षा जुलै आणि ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना यावर्षी जेईई मेन्स 2021 परीक्षेसाठी चार संधी देण्यात आल्या आहेत. ज्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त होतील त्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.
या वर्षी विद्यार्थ्यांना अर्ज भरताना आपल्या सोयीनुसार परीक्षा केंद्र निवडण्याची संधी देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सध्याच्या स्थितीत खबरदारी म्हणून परीक्षा केंद्राची संख्या सुद्धा पूर्वीपेक्षा दुप्पटीने वाढवली आहे. जेणेकरून कोरोनासंबंधी सोशल डिस्टनसिंग व इतर नियमांचे काटोकोरपणे पालन होईल याची खबरदारी सुद्धा घेण्यात आली आहे