एक्स्प्लोर

राज्यसभेत महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप

नवी दिल्ली : राज्यसभेत कॅम्पा विधेयकावर चर्चा सुरु असताना, काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. वनीकरण व्यवस्थापन आणि नियोजन प्राधिकरण अर्थात Compensatory Afforestation Management and Planning Authority (CAMPA) कडे असणारा निधी राज्यांकडे वर्ग करण्यासंदर्भातलं हे विधेयक आहे.   या विधेयकानुसार जवळपास 40 हजार कोटींचा निधी राज्यांना दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातली वन खाती सक्षम होणार आहेत. पण त्याचवेळी या विधेयकात आदिवासींच्या, ग्रामसभेच्या हक्कांचा विचार करण्यात आलेला नाही, असं जयराम रमेश यांचं म्हणणं आहे. या विधेयकानं राज्यांकडे पैसा तर येईल, पण तो वनजमिनी, आदिवासींच्या हितार्थ वापरला जाणार नाही, असा आरोप रमेश यांनी केला.   आपल्या उदाहरणाला पुष्टी देताना रमेश यांनी तीन राज्यांची उदाहरणं दिली आहेत, त्यात महाराष्ट्राचंही उदाहरण आहे. 2006 साली वनहक्क कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क सरकारकडून लोकांना देण्यात आले. म्हणजे काय तर त्या वनांची निगराणी लोकांनी करायची त्या बदल्यात, वनांमधून येणारं उत्पन्नही त्यांनीच वापरायचं. महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढालेखा हे त्याचं उत्तम उदाहरण.   खरंतर देशात सामूहिक वनहक्क प्रदान करण्याची सुरुवातच मेंढालेखा या गावापासून झाली. मेंढालेखातल्या देवाजी तोफांनी या वनहक्क चळवळीच्या माध्यमातून गावाचा चांगलाच विकास केला आहे. त्याचाही उल्लेख जयराम रमेश यांनी आपल्या भाषणात केला.   मात्र एकीकडे अशी वाहवा होत असतानाच महाराष्ट्र सरकारनं 18 जून 2015 ला व्हिलेज फॉरेस्ट रुल्स संदर्भातलं एक नोटिफिकेशन जारी केलं आहे. या नोटिफिकेशनमध्ये वन खात्याला सामूहिक वनहक्क काढून घेता येऊ शकतात अशी एक नवी अट समाविष्ट केली आहे. त्यामुळे ग्रामसभेच्या अधिकारावर अतिक्रमण येऊ शकतं, असा जयराम रमेश यांचा दावा आहे. महाराष्ट्र सरकानं हे नोटिफिकेशन काढून वनखात्याची मनमानी वाढवल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Maharashtra Live Blog Updates: अकोल्याच्या राजकारणात मोठे उलटफेर; ठाकरेंचे सहापैकी चार नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत
Eknath Shinde Shivsena: आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
आधी काम करा मग पदाची अपेक्षा ठेवा, तुम्ही दिल्लीत असलात तरी तुमच्यावर माझं लक्ष आहे; एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या खासदारांना सुनावलं
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharashiv Rain and Hailstorm: धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
धाराशिवमध्ये भयानक गारपीट अन् पाऊस, कलिंगडाचं सोन्यासारखं पीक पाण्यात गेलं, बळीराजा हवालदील
Sara Ali Khan Entry Banned Without Affidavit In Kedarnath: 'तिनं अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
'अ‍ॅफिडेविटमध्ये लिहावं मी सनातनी, मगच...'; अटींची पूर्तता केल्याशिवाय सारा अली खानला केदारनाथ मंदिरात 'नो एन्ट्री'
Kuldeep Yadav Vanshika Chadha Wedding Reception: योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
योगी आदित्यनाथ, रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल; कुलदीप-वंशिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला कोणकोण?, PHOTO
Donald Trump Iran Conflict: अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
अमेरिकन लष्करात बंडाळी? इराण युद्धाविरोधात बड्या लष्करी अधिकाऱ्याचा राजीनामा, डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
Doordarshan Mahabharat Actress Renuka Story: वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते अशी, ओळखणंही झालंय कठीण!
वय वर्ष फक्त 22, पडद्यावर साकारली 100 पुत्रांची आई; दूरदर्शनच्या महाभारताची 'गांधारी' खऱ्या आयुष्यात आता दिसते कशी?
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
Embed widget