एक्स्प्लोर
Advertisement
‘त्या' पोस्टरनं बुमराह नाराज, जयपूर ट्रॅफिक पोलिसांना सुनावलं!
मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्ध झालेला पराभव आजही कोट्यवधी चाहत्यांच्या मनाला बोचत आहे. बुमराहनं टाकलेला नो-बॉल हा या सामन्यात टर्निंग पॉईंट ठरला होता. तोच नो-बॉल बुमराहची अजूनही पाठ सोडत नसल्याचं दिसतं आहे.
कारण की, जयपूरच्या ट्रॅफिक पोलिसांनी बुमराहच्या ‘नो बॉल’चं उदाहरण देत ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन करणारे चक्क पोस्टर्स लावले आहेत. पण या पोस्टर्समुळे बुमराह खूपच नाराज झाला आहे. जयपूर पोलिसांच्या या पोस्टरला बुमराहनं ट्वीटरवरुन उत्तर दिलं आहे.
याबाबत बुमराहनं एक ट्विट करुन जयपूर ट्रॅफिक पोलिसांना मार्मिक शब्दात सुनावलं. ‘अतिशय उत्तम जयपूर ट्रॅफिक पोलीस! तुम्ही दाखवून दिलंत की, देशासाठी आपलं सर्वोत्कृष्ट देण्याऱ्या खेळाडूबाबत तुमच्या मनात किती सन्मान आहे.
पण तुम्ही काळजी करु नका, मी तुम्ही केलेल्या चुकीची थट्टा करणार नाही, कारण की, मला माहितीय की, चूक ही माणसांकडूनच होते.@traffic_jpr well done Jaipur traffic police this shows how much respect you get after giving your best for the country. pic.twitter.com/y0PU6v9uEc
— Jasprit bumrah (@Jaspritbumrah93) June 23, 2017
@traffic_jpr But don't worry I won't make fun of the mistakes which you guys make at your work .because I believe humans can make mistakes — Jasprit bumrah (@Jaspritbumrah93) June 23, 2017दरम्यान, बुमराहच्या या ट्विटनंतर जयपूर ट्रॅफिक पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाचं ट्विटरवरच स्पष्टीकरण दिलं. प्रिय बुमराह, तुला किंवा कोट्वधी क्रिकेट चाहत्यांना दुखवण्याची आमची अजिबात भावना नव्हती.
आम्ही फक्त या प्रसंगातून ट्रॅफिकबाबत लोकांना जागरुक करण्याचा प्रयत्न करत होतो.Dear @jaspritbumrah93, our intent was not to hurt your sentiments or the sentiments of millions of cricket fans.
— Traffic Police JPR (@traffic_jpr) June 23, 2017
.@jaspritbumrah93, we only intended to create more awareness about traffic rules. — Traffic Police JPR (@traffic_jpr) June 23, 2017तू युवकांसाठी आदर्श आहेस आणि आम्हा सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत.
असं ट्वीट करुन जयपूर ट्रॅफिक पोलिसांनी या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बुमराहचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं असलं तरीही हे पोस्टर हटवणार की नाही? याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. संबंधित बातम्या: Champion Trophy 2017 : भारताच्या पराभवाची पाच कारणं 10 जणांचा 79, एकट्याच्या 76 धावा, हार्दिक पांड्याचा नवा विक्रम टीम इंडियाच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानच्या विजयावर सेहवाग म्हणाला....@jaspritbumrah93, you are a youth icon & an inspiration for all of us.
— Traffic Police JPR (@traffic_jpr) June 23, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement