एक्स्प्लोर

काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांना शिकवला धडा, वर्षभरात तब्बल 172 दहशतवाद्यांना धाडले यमसदनी  

Jammu Kashmir News : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्यासह नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या या मनसुब्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

Jammu Kashmir News : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ( Terrorist) विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या वर्षभरात म्हणजे 2022  मध्ये एकट्या काश्मीर झोनमध्ये तब्बल 172 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले आहे. काश्मीरच्या डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षात काश्मीरमध्ये तब्बल 93 एनकाऊंटरच्या यशस्वी कारवाया करण्यात आल्या आहेत. डीजीपींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून वर्षभरात करण्यात आलेल्या कारवायांची माहिती दिली आहे. 172 पैकी 42 दहशतवादी हे परदेशातील आहेत.   

डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये सर्वात जास्त म्हणजे 108 दहशतवादी हे लष्कर ए तैयबा आणि टीआरएफ या संघटनांचे आहेत. त्यानंतर जैश ऐ मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे 35, एसएम 22, अब बद्रचे चार आणि एडीयूएच या संघटनेच्या 3 दहशतवाद्यांचा समावेश आहे. या वर्षी दहशवादी संघटनांमध्ये नव्याने भरती होणाऱ्यांची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 37 टक्क्यांनी घटली आहे. या वर्षी 74 जण दहशवादी संघटनेते भरती झाले होते. त्यातील 65 जणांचा भारतीय लष्कराने खात्मा केलाय. यातील 17 दहशतवाद्यांना अटक केली आहे. 18 दहशतवादी अद्याप सक्रिय आहेत.   

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशत पसरवण्यासह नागरिकांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केलं जात आहे. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांच्या या मनसुब्यांना सडेतोड उत्तर दिले आहे. सुरक्षा दलांनी खात्मा केलेल्या 65 दहशतवाद्यांपैकी 58 दहशवादी हे नव्याने भरती झाले होते. त्यांना भरती झाल्यानंतर पहिल्याच महिन्यात यमसदनी धाडणयात आले, अशी माहिती डीजीपींनी दिली. 

मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त 

सुरक्षा दलाने केलेल्या कारवाईत दहशतवाद्यांच्या कात्म्यासह शस्त्रसाठा देखील मोठ्या प्रमाणत जप्त करण्यात आला आहे. दहशवाद्यांविरोधातील मोहिमेदरम्यान तब्बल 360 शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 121 एके सीरीज रायफल, 8 एम4 कार्बाइन आणि 231 पिस्तुलांचा समावेश आहे. याशिवाय दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात आयईडी, चिकट बॉम्ब आणि ग्रेनेडही जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक दहशतवादी घटना टळल्या आहेत.

29 नागरिकांचा मृत्यू 

डीजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात 29 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यातील 21 काश्मीरचे स्थानिक नागरिक आणि 8 जण इतर राज्यातील होते. स्थानिक 29 नागरिकांपैकी तीन काश्मिरी पंडीत, 15 मुस्लिम नागरिक आणि 6 हिंदू नागरिकांचा समावेश आहे.   

महत्वाच्या बातम्या

खळबळजनक! भाजपच्या माजी आमदाराच्या बंगल्याबाहेर आढळला महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget