![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 36 जणांचा मृत्यू
Doda Bus Accident : जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.
![Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 36 जणांचा मृत्यू jammu kashmir bus accident latest update bus fall in steep slope many feared dead in doda Jammu Kashmir Accident : जम्मू-काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना! 250 मीटर खोल दरीत कोसळली बस, 36 जणांचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/15/6d5149a912cab42382ea1e5c3dff8f58170003771484375_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jammu Kashmir Bus Accident : जम्मू काश्मीरमध्ये (Jammu & Kashmir) मोठी दुर्घटना घडली आहे. बस 250 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरच्या डोडा येथे बस दरी कोसळून ही भीषण दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातग्रस्त बसमध्ये सुमारे 50 प्रवासी होते, अशी माहिती समोर येत आहे. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरु आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये भीषण बस अपघात
किश्तवाडहून जम्मूकडे जाणाऱ्या बसला दोडा जिल्ह्यातील भीषण अपघात झाला आहे. प्रवासी बस आसार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून 250 मीटर खोल दरीत कोसळली आहे. या अपघातात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळताच पोलीस दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.
#WATCH | At least five people died in a bus accident in Assar region of Doda in J&K. Injured shifted to District Hospital Kishtwar and GMC Doda. Details awaited. pic.twitter.com/vp9utfgCBR
— ANI (@ANI) November 15, 2023
दुर्घटनेत 36 जणांचा मृत्यू
डोडा येथील पोलीस नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या प्राथमिक अहवालानुसार, अपघातातील मृतांची संख्या 36किंवा त्याहून अधिक असू शकते. किश्तवाडहून जम्मूकडे जाणारी बस डोडा जिल्ह्यातील अस्सार भागातील त्रंगलजवळ रस्त्यापासून घसरली आणि दुसऱ्या रस्त्यावर 250 मीटर खाली पडली, असे पोलिस नियंत्रण कक्ष डोडामधील एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
प्रवाशांनी भरलेली बस 250 फूट खोल दरीत कोसळली
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील असार भागात बुधवारी प्रवाशांनी भरलेली बस 250 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला. तर 19 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. किश्तवाडहून जम्मूला जाणारी बस रस्त्यावरून घसरली आणि थेट दरीत कोसळली.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
घटनेनंतर बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. बसचा पार चुराडा झाला होता. लोकांचे मृतदेह रस्त्यावर पसरले होते. बचाव पथकानं सांगितलं की, जखमींना किश्तवाड जिल्हा रुग्णालय आणि सरकारी वैद्यकीय महाविद्यालय, डोडा येथे दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना विमानाने जम्मूला हलवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mahadev App and Dabur : महादेव अॅप घोटाळ्याचे धागेदोरे डाबर ग्रुपपर्यंत? कंपनीने आरोप फेटाळले, 'त्या' डीलच्या टायमिंगकडे वेधले लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)