जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात मेजरसह जवान शहीद
आयईडी स्फोट पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर अॅक्शन टीमने घडविला असल्याचे समजते. भारतीय जवानांना आयईडी स्फोट आणि पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून हल्ल्याबाबत अलर्टही देण्यात आला होता.
काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषा परिसरात शुक्रवारी आयईडी स्फोटात लष्कराचे एक मेजर आणि एक जवान शहीद झाले आहेत. संशयित दहशतवाद्यांनी जवानांना टार्गेट करण्यासाठी नौशेरा सेक्टरच्या लाम परिसरातील नियंत्रण रेषेवर आयईडी स्फोट घडवून आणला.
लष्कर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात एका मेजरसह दोन जवान गंभीर जखमी झाले होते. तिघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर अॅक्शन टीमने घडविला असल्याचे समजते. भारतीय जवानांना आयईडी स्फोट आणि पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून हल्ल्याबाबत अलर्टही देण्यात आला होता.
Army PRO: Two Army personnel lost their lives in an IED blast in Naushera. More details awaited. #JammuandKashmir
— ANI (@ANI) January 11, 2019
श्रीनगरमधील सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांनी हातगोळे फेकले
दहशतवाद्यांनी शुक्रवारी श्रीनगरमधील सीआरपीएफच्या बंकरवर दहशतवाद्यांनी हातगोळे फेकले. सुदैवाने या हल्ल्यात कोणतीती जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी शुक्रवारी संध्याकाळी लाल चौक सिटी सेंटरच्या पल्लाडियम सिनेमाजवळील सीआरपीएफ बंकरवर हा हल्ला चढवला.