एक्स्प्लोर
VIDEO : सहामजली इमारतीवरुन पडून विद्यार्थिनीचा मृत्यू
जयपूरमध्ये माऊंटनियरिंग कॅम्पदरम्यान सहामजली इमारतीच्या गच्चीवरुन तोल गेल्याने खाली पडून विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
जयपूर : माऊंटनियरिंग कॅम्प सुरु असताना इमारतीच्या टेरेसवरुन तोल जाऊन पडल्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सहामजली इमारतीवरुन थेट खाली कोसळल्याने अदिती संघीचे प्राण गेले. विशेष म्हणजे अदिती आणि तिचे वडील यावेळी इतर विद्यार्थ्यांना माऊंटनियरिंगचं ट्रेनिंग देत होते.
राजस्थानमधील जयपूरच्या मानसरोवर परिसरातील आयआयएस विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. द्वितीय वर्ष कला शाखेची विद्यार्थिनी असलेली अदिती आणि तिचे वडील सुनील संघी इतरांना माऊंटनियरिंग आणि झीप लाइनिंगचं प्रशिक्षण देत होते.
उंचावरुन उतरताना झीप लाइनचा वापर कसा करावा, याचं प्रशिक्षण दिलं जात होतं. अदितीने तिचा डेमो संपवल्यामुळे तिने सुरक्षेसाठी बांधला जाणारा हार्नेस उतरवला होता. तितक्यातच इमारतीच्या गच्चीच्या
कठड्यावर उभ्या असलेल्या अदितीचा तोल गेला आणि ती खाली पडली.
दुर्घटनेनंतर अदितीला जवळच्या मेट्रो मास रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.
दरम्यान, हा एक दुर्दैवी अपघात असून विद्यापीठाचा यात काहीही संबंध नसल्याचं अदितीच्या वडिलांनी सांगितलं. अदितीचे वडील सुनील संघी हे प्रशिक्षित इन्स्ट्रक्टर असून दरवर्षी ते विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देतात. अदितीनेही माऊंटनियरिंगचं प्रशिक्षण घेतलं होतं.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement