ISRO XPoSat Mission: सूर्य आणि चंद्रानंतर आता ब्लॅक होलमधली रहस्य उलगडणार, संशोधनासाठी नव्या वर्षात इस्रोची नवी मोहीम
ISRO : नवीन वर्षाच्या सुरुवातीबरोबरच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने नवा इतिहास रचण्याची पूर्ण तयारी केली असून त्याच्या काऊंटडाऊनला देखील सुरुवात झाली आहे.
![ISRO XPoSat Mission: सूर्य आणि चंद्रानंतर आता ब्लॅक होलमधली रहस्य उलगडणार, संशोधनासाठी नव्या वर्षात इस्रोची नवी मोहीम ISRO will launch X-Ray Polarimeter Satellite XPoSat on 1 January 2024 from satish dhawan space centre Sriharikota Andhra Pradesh detail marathi news ISRO XPoSat Mission: सूर्य आणि चंद्रानंतर आता ब्लॅक होलमधली रहस्य उलगडणार, संशोधनासाठी नव्या वर्षात इस्रोची नवी मोहीम](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/31/bec6152c9ed319f84f0b55e0db5af10f1704019759664720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : भारत पुन्हा एकदा नवा इतिहास रचून नव्या वर्षाची सुरुवात करणार आहे. चांद्रयान-3 (Chandrayan 3) आणि आदित्य एल1 (Aaditya L1) नंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) सोमवार 1 जानेवारी रोजी पहिला एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह (एक्सपोसॅट) प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झालंय. कृष्णविवरांसारख्या खगोलीय सृष्टीची रहस्ये उलगडणाऱ्या या प्रक्षेपणाने नवीन वर्षाचे स्वागत केले जाईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी 9 वाजून 10 मिनिटांनी पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल रॉकेटवर याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
ऑक्टोबरमध्ये इस्रोकडून गगनयान चाचणी यान 'डी1 मिशन'चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ही मोहीम पुढील पाच वर्षांसाठी सक्रिय राहणार असल्याचं सांगण्यात येतंय. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)-C58 रॉकेट, त्याच्या 60 व्या मोहिमेवर, मुख्य पेलोड 'EXPOSAT' आणि 10 इतर उपग्रह घेऊन जाणार आहे. हे पृथ्वीच्या सगळ्या खालच्या कक्षेत ठेवण्यात येईल.
🚀 PSLV-C58/ 🛰️ XPoSat Mission:
— ISRO (@isro) December 31, 2023
The launch of the X-Ray Polarimeter Satellite (XPoSat) is set for January 1, 2024, at 09:10 Hrs. IST from the first launch-pad, SDSC-SHAR, Sriharikota.https://t.co/gWMWX8N6Iv
The launch can be viewed LIVE
from 08:40 Hrs. IST on
YouTube:… pic.twitter.com/g4tUArJ0Ea
अनेक रहस्य उलगडणार
चेन्नईच्या पूर्वेला सुमारे 135 किमी अंतरावर असलेल्या अंतराळ केंद्रातून नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी 9.10 वाजता प्रक्षेपणासाठी 25 तासांचे काउंटडाउन रविवारी 31 डिसेंबर सुरू झाले आहे. इस्रोच्या सूत्रांनी सांगितले की, "पीएसएलव्ही-सी58 साठी आज सकाळी 8.10 वाजता काऊंटडाऊन सुरु करण्यात आले."
एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट (एक्सपोसॅट) क्ष-किरण स्त्रोताचे रहस्य उलगडण्यास आणि 'ब्लॅक होल' च्या रहस्यमय जगाचा अभ्यास करण्यास मदत करणार आहे. इस्रोच्या मते, अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनांमध्ये खगोलशास्त्रीय स्त्रोतांकडून एक्स-रे उत्सर्जनाचा अभ्यास करणारा हा स्पेस एजन्सीचा पहिला वैज्ञानिक उपग्रह आहे.
नासाने देखील केला होता हा अभ्यास
भारतीय अंतराळ एजन्सी ISRO व्यतिरिक्त, यूएस स्पेस एजन्सी NASA ने डिसेंबर 2021 मध्ये सुपरनोव्हा स्फोटाचे अवशेष, कृष्णविवरांमधून बाहेर पडणाऱ्या कणांचे प्रवाह आणि इतर खगोलीय घटनांवर असाच अभ्यास केला होता. इस्रोने सांगितले की, क्ष-किरण ध्रुवीकरणाचा अवकाश-आधारित अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचा ठरत आहे आणि या संदर्भात EXPOSACT मिशन महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)