एक्स्प्लोर
इस्रोच्या जीसॅट-6 ए उपग्रहाचं प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून जीसॅट-6 ए उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे.
नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)कडून जीसॅट-6 ए या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. उच्च शक्तीच्या एस बँड संचार उपग्रहाने युक्त असलेल्या या उपग्रहाचं आयुष्यमान दहा वर्ष आहे. हा उपग्रह जियोसिनक्रोनस उपग्रह प्रक्षेपण याना (जीएसएलव्ही-एफ 08)द्वारे अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
श्रीहरिकोटा केंद्रावरून GSLV-F08 हे यान दुपारी 4 वाजून 56 मिनिटांनी अवकाशात झेपावलं. या मोहिमेचं काऊंटडाऊन बुधवारी दुपारी 1 वाजून 56 मिनिटांनी सुरु झाल्याचं इस्रोकडून सांगण्यात आलं होतं.
‘जीसॅट-6’ प्रमाणेच ‘जीसॅट-6 ए’ हा उपग्रह असल्याचे इस्रोने स्पष्ट केलं असून, या उपग्रहामुळे आयटी इंजिनियर्सना आपले नवनवे उपक्रम तयार करण्यासाठी मदत मिळेल.
या उपग्रहाची वैशिष्ट्ये
- या उपग्रहात 6 एमएस बँड अनफ्लेरेबल अॅन्टिना, हॅडहेल्ड ग्राऊंड टर्मिनल आणि नेटवर्क व्यवस्थापन तंत्रज्ञान आदीचा समावेश आहे.
- या उपग्रहाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, यात मल्टी बीम कव्हरेज सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे भारताला मोबाईल संचार प्राप्त होईल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement