(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ISRO Gaganyaan : इस्रो नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज! गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट! 21 ऑक्टोबरला अबॉर्ट मिशन-1 चं प्रक्षेपण
Gaganyaan Mission : इस्रोच्या महत्त्वाकांक्षी पहिल्या मानवी मोहिमेतील अबॉर्ट मिशन-1 चं प्रक्षेपण (ISRO Gaganyaan Crew Module Abort Test) 21 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे.
ISRO Human Space Mission : चांद्रयान-3 (Chandrayaan-3) मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) नवा अध्याय लिहिण्यासाठी सज्ज झाली आहे. इस्रो (ISRO) कडून पहिल्या मानवी मोहिम लाँच करण्यात येणार असून त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. गगनयान मोहिमेसाठीची महत्वाची चाचणी (ISRO Gaganyaan Abort Test) या महिन्यात केली जाणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. गगनयान मोहिमेतील अबॉर्ट मिशन-1 चंप्रक्षेपण 21 ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. चांद्रयान-3 (Moon Mission) यशानंतर आता गगनयान मोहिमेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
21 ऑक्टोबरला गगनयानची अबॉर्ट टेस्ट
इस्रोचं गगनयान (Gaganyaan) ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम असून या मोहिमेमुळे अंतराळातील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठीच्या पहिल्या क्रू मॉड्यूल (ISRO Gaganyaan Module Update) ची पहिली अबॉर्ट चाचणी (Abort Test) 21 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. इस्रोकडून क्रू एस्केप सिस्टमची अबॉर्ट टेस्ट (Crew Escape System Abort Test) साठीची तयारी पूर्ण झाली आहे.
IANS वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, पत्रकारांशी संवाद साधताना भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, TV-D1 ची पहिली मानवरहित चाचणी मिशन 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गगनयान मोहिमेच्या प्रणाली (Module) ची चाचणी करण्यासाठी आणखी तीन चाचणी TV-D2, TV-D3 आणि TV-D4 करण्यात येतील.
इस्रोच्या गगनयान मोहिमेबाबत मोठी अपडेट
अबॉर्ट टेस्टमध्ये सुमारे 17 किमी उंचीवर चाचणी वाहनापासून क्रू मॉड्यूल वेगळे होणे अपेक्षित असेल. गगनयान मोहिमेत जर कोणतीही अडचण आली तर, अंतराळवीरांना मॉड्यूलसह सुरक्षित पृथ्वीवर आणण्यासाठी क्रू मॉड्यूल अबॉर्ट टेस्ट केली जात आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास गगनयान मोहिमेसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरेल.
गगनयान मोहिमेची अबॉर्ट टेस्ट कशी असेल?
गगनयान मोहिमेची अबॉर्ट टेस्ट कशी असेल याबाबत सविस्तर जाणून घ्या. अबॉर्ट टेस्ट ही अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी घेण्यात येणारी चाचणी आहे. गगनयान मोहिमेदरम्यान, काही तांत्रिक बिघाड किंवा अडचण आल्यास अंतराळवीरांना सुरक्षित पृथ्वीवर आणण्याची तंत्रज्ञानाची ही चाचणी आहे. गगनयान अबॉर्ट टेस्टमध्ये गगनयानचं क्रू मॉड्यूलचं लाँच व्हेईकलद्वारे प्रक्षेपण करण्यात येईल. क्रू मॉड्यूलने अवकाशात भरारी घेऊन त्यानंतर ठराविक उंची गाठल्यानंतर क्रू मॉड्यूल रॉकेटपासून वेगळं होईल आणि समुद्रात लँड होईल. बंगालच्या उपसागरात क्रू मॉड्यूलने टचडाउन केल्यानंतर, भारतीय नौदलाचे जहाज आणि डायव्हिंग टीम वापरून क्रू मॉड्यूल पुन्हा ताब्यात घेईल.
गगनयान भारताची पहिली मानवी अंतराळ मोहिम
गगनयानही इस्रोची पहिली मानवी अंतराळ मोहिम असेल. इस्रोची गगनयान मोहिम तीन टप्प्यांत असेल. दोन मोहिमा मानवरहित तर तिसरी मोहिम मानवी अंतराळ मोहिम असेल. पहिल्या टप्प्यात गगनयान मोहिमेत व्योमित्र नावाचा रोबोट अंतराळात पाठवण्यात येणार आहे. गगनयान मोहिमेत मानवासाठी अनूकुलता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी आधी रोबोट अवकाशात पाठवला जाईल.
महत्वाच्या इतर बातम्या :