एक्स्प्लोर

Israel Iran Conflict: किंतूरमध्ये शोककळा! खामेनींच्या निधनाने हादरलेलं बाराबंकीतील गाव, काय आहे कनेक्शन?

Ayatollah Ali Khamenei Connection Kintur Barabanki : खामेनींचे आजोबा हे मूळचे यूपीतील असल्याचा दावा किंतूरमधील गावकऱ्यांनी केला आहे. खामेनींच्या मृत्यूनंतर या गावात शोककळा पसरल्याचं चित्र आहे.

Israel Iran Conflict : इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते आणि धर्मगुरू अयातुल्ला अली खामेनींच्या मृत्यूच्या बातमीने उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर गावात शोककळा पसरली. खामेनींचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचे मूळ या गावाशी संबंधित असल्याची माहिती आहे.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायली हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष तीव्र होत असताना या घटनेचे पडसाद भारतातही उमटले आहेत. विशेषतः उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील किंतूर हे छोटेसे गाव शोकाकुल झाले आहे.

बाराबंकीच्या सिरौली गौसपूर तहसीलमधील किंतूर गावाचा खामेनी कुटुंबाशी ऐतिहासिक संबंध असल्याचं सांगितलं जातं. अयातुल्ला खामेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी हे 18व्या-19व्या शतकात याच गावात राहत होते, अशी माहिती स्थानिकांकडून दिली जाते.

Kintur Historical Connection With Khamenei : किंतूरशी ऐतिहासिक नाळ

स्थानिक वयोवृद्धांच्या मते, सय्यद अहमद मुसावी हिंदी यांनी आपल्या नावामागे ‘हिंदी’ हा शब्द जोडून मूळ भारतीय ओळख जपली होती. या गावात आजही काही जुनी कागदपत्रे आणि परंपरागत वास्तूंच्या आठवणी या ऐतिहासिक नात्याची साक्ष देतात, असं सांगितलं जातं.

सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवरून हल्ल्याची आणि मृत्यूची बातमी गावात पोहोचताच नागरिकांनी घरात बसून घडामोडींचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावात एक प्रकारचे स्तब्ध वातावरण पसरले.

Village In Mourning : किंतूर गावात शोककळा

स्थानिक रहिवासी सय्यद निहाल मिया यांनी भावुक होत ही घटना केवळ इराणची नाही तर संपूर्ण जगाची हानी असल्याचे म्हटलं. डॉ. रेहान काजमी यांनीही ही मोठी दुःखद घटना असल्याची भावना व्यक्त केली. अनेक ग्रामस्थांनी या घटनेला 'इतिहासातील वेदनादायक क्षण' असं संबोधलं.

गावातील नागरिक एकत्र येऊन जुन्या आठवणी आणि या ऐतिहासिक नात्याविषयी चर्चा करत असल्याचं चित्र आहे. हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद या छोट्या गावातही स्पष्टपणे उमटत आहेत.

किंतूरसारख्या छोट्या गावाचे नाव जागतिक पातळीवर चर्चेत आले असले तरी ग्रामस्थांमध्ये दुःख आणि अस्वस्थतेची भावना अधिक आहे. ऐतिहासिक संबंधाचा अभिमान असला तरी अशा दु:खद प्रसंगाने गावकऱ्यांना अंतर्बाह्य हादरवल्याचं चित्र आहे.

West Asia Tension Impact : पश्चिम आशियातील तणावाचे जागतिक परिणाम

इराण-इस्रायल संघर्षामुळे पश्चिम आशियात अस्थिरता वाढली आहे. विविध देशांकडून शांततेचे आवाहन करण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मते, या घटनेचा आंतरराष्ट्रीय राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. सध्या संपूर्ण जगाचे लक्ष या भागाकडे लागले आहे.

ही बातमी वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Ship Shivalik : होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
होर्मुझमधून आलेलं भारताचं ‘शिवालिक’ जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरात; भारताला मोठा दिलासा
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Rasgulla Choking Death : रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वास गुदमरून एकाचा दुर्दैवी मृत्यू; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला
रसगुल्ला खाताना घशात अडकला, श्वासही घेता येईना; लग्नाचा आनंद क्षणात स्मशान शांततेत बदलला, झारखंडच्या जमशेदपुरमधली धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget