एक्स्प्लोर

होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन जहाजांवर इराणचा हल्ला, पुण्यातील इंजिनिअरचा मृत्यू तर 10 जण जखमी 

अमेरिका-इराण युद्धाचा जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. या दोन्ही देशांनी ऐकमेकांवर हल्ला सुरु केल्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Iran USA War News : अमेरिका-इराण युद्धाचा (Iran USA War )जगातील अनेक देशांना फटका बसला आहे. या दोन्ही देशांनी ऐकमेकांवर हल्ला सुरु केल्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अशातच होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने दोन युएईच्या जहाजांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले आहेत. 

23 जणांना वाचवण्यात यश आले

एमव्ही जीएफएस गॅलेक्सी या कंटेनर जहाजावरील 'थर्ड इंजिनिअर' हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार हेरंब करमकर हे मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होते. त्यांचं एमव्ही जीएफएस गॅलेक्सी हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील ओमानच्या हद्दीतून जात असताना रविवारी पहाटे त्याच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यामुळे जहाजावरील कर्मचारी अडकून पडले होते. यापैकी 23 जणांना वाचवण्यात यश आले. मात्र हेरंब यांना वाचवता आलं नाही. त्यांचा मृतदेह पुण्यातील त्यांच्या घरी आणण्यासाठी आता प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पुण्यातील मुंढवा भागात त्यांचे घर आहे.

अशा पद्धतीच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, युएईने दिला इशारा 

यासंदर्भात UAE च्या संरक्षण मंत्रालयाने अधिक माहिती दिली आहे. त्यानुसार, इराणने क्रूझ मिसाइलच्या सहाय्याने यूएईच्या 'मोम्बासा' नावाच्या तेल टँकरवर आणि 'अल बहिया' नावाच्या LNG जहाजावर हल्ला केला. ही जहाजे दक्षिण शिपिंग लेनवरून जात होती. या हल्लाने दोन्ही जहाजांना भीषण आग लागली होती. मात्र तिच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, या हल्ल्यासंदर्भात संताप व्यक्त करत, हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. अशा हल्ल्यांमुळे प्रदेशातील तणाव अधिक वाढू शकतो. हा तणाव वाढू नये, यासाठी अशा पद्धतीच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्हाल आहे, असा थेट इशारा युएईने दिला आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला,  होर्मुझच्या सामुद्रधुनीत पडसाद

अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. दोन्ही देशांनी पुन्हा एकदा एकमेकांवर हल्ले सुरु केले आहेत. या सर्व घटनांचे पडसाद होर्मुझ सामुद्रधुनीत उमटत आहेत. इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या दोन जहाजांवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. याबरोबरच 10 जण जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती यूएईच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षाचे परिणाम संपूर्ण आखातावर दिसू लागले आहेत.

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Advertisement

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Embed widget