Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर, एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?
IOCL, Petrol-Diesel Price Today 8 April 2022 : आज देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही.
IOCL, Petrol-Diesel Price Today 8 April 2022 : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. सातत्यानं वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. अशातच आज भारतीय तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला आहे. आज देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. इंधन दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
देशात 22 मार्चनंतर आजपर्यंत 14 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. या दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या दरांत 10 रुपयांची वाढ झाली आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर, 2021 नंतर जवळपास चार महिन्यांपर्यंत तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केली नव्हती. या दरम्यान, ग्लोबल मार्केटमध्ये कच्चं तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या वर गेलं होतं. त्यावेळी तेल कंपन्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला होता.
कालही (गुरुवारी) पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. आजही तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे सलग दोन दिवस देशांत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सध्या देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलची किंमत 120.51 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 104.77 रुपये प्रति लिटर आहे. तसेच, राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपयांवर स्थिर आहे. दरम्यान, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर वर पोहोचला आहे. त्यामुळे परभणीत महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल विकलं जात आहे.
देशातील महानगरांत दर काय?
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9-12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.
दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).