एक्स्प्लोर

आयएनएक्स मीडियाप्रकरणी पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ

पी. चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवस वाढ करण्यात आली होती आणि ही मुदत आज संपणार होती. आज त्यांना कोर्टात हजर केलं असता पुन्हा तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी करण्यात आलेल्या सीबीआय कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ केली आहे. सीबीआयने चौकशीसाठी कोर्टाकडे चिदंबरम यांची आणखी पाच दिवस कोठडीची मागणी केली होती. ज्यावर कोर्टाने प्रश्न विचारला की आठ ते दहा तास चौकशी झाली असूनही त्यांच्या कोठडीत वाढीची मागणी का केली जात आहे.

पी. चिदंबरम चौकशीत सहकार्य करत नाहीत, ते प्रत्येकवेळी एकच उत्तर देतात आणि अधिक चौकशीसाठी त्यांना आरोपींच्या समोर नेण्याची आवश्यकता आहे त्यासाठीच आणखी पाच दिवसांची कोठडी सुप्रीम कोर्टाकडे मागितली असल्याचं सीबीआयने सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं.

दरम्यान कोर्टाने सीबीआयला एकाच वेळी 15 दिवसांची कोठडी का मागितली नाही असा प्रश्न केला. याअगोदर पी. चिदंबरम यांच्या कोठडीत चार दिवस वाढ करण्यात आली होती आणि ही मुदत आज संपणार होती. आज त्यांना कोर्टात हजर केलं असता पुन्हा तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होणार आहे.

यापूर्वी INX media प्रकरणी माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता. चिदंबरम यांच्या अटकेसंदर्भात दिल्ली हायकोर्टाने ईडीला आदेश दिले होते. ही अटक रद्द व्हावी, म्हणून चिदंबरम यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. चिदंबरम यांना सीबीआयनं अटक केल्यानंतर या सुनावणीची गरज नसल्याचं कोर्टानं सांगितलं. त्याचप्रमाणे जर आपल्याला जामीन हवा असेल तर त्यासाठी योग्य त्या कोर्टात जावं, असा सल्लाही कोर्टाने चिदंबरम यांच्या वकिलांना दिला आहे.

काय आहे प्रकरण?

UPA-1 सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या काळात एफआयपीबीने दोन प्रकल्पांना मंजुरी दिली होती. अर्थमंत्री असताना चिदंबरम यांच्या कार्यकाळात 2007 मध्ये 305 कोटी रुपयांचं परदेशी चलन मिळवण्यासाठी आयएनएक्स मीडिया समूहला दिलेल्या एफआयपीबी मंजुरीत अनियमितता झाली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात सीबीआयने 15 मे 2017 रोजी प्राथमिक गुन्ह्याची नोंद केली होती. तर ईडीने मागील वर्षी या संबंधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Embed widget