एक्स्प्लोर
मुख्यमंत्री पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्या उद्योगपतीला अटक
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकत उपचार सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवणाऱ्या एका उद्योजकाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.
वास्को (गोवा) : अमेरिकेत उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीबद्दल फेसबुकवरुन अफवा पसरवणाऱ्या एकाला वास्कोतून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव केनेथ सिल्वेरा असं असून तो उद्योगपती असल्याचं समजतं आहे. सिल्वेरा यांनी पणजी मतदारसंघातून मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक देखील लढवली होती.त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर सोशल मीडियावरुन सिल्वेरा यांनी पर्रिकर आणि भाजपसरकार विरोधात आघाडी उघडली होती.
काल (बुधवार) त्यांनी पर्रिकरयांच्या प्रकृतीबद्दल चुकीची माहिती फेसबुकवर शेअर करून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गुन्हा अन्वेषण विभागाने सिल्वेरा यांना अटक केली.
मुख्यमंत्री पर्रिकर हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असून त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे. आतापर्यंत 2 टप्प्यात त्यांच्यावर उपचार झाले आहेत. येत्या सोमवारी त्यांच्यावर तिसऱ्या टप्प्यातील उपचार सुरु होणार आहेत. त्यानंतर तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ते गोव्यात परततील. अशी माहिती नुकतीच भाजप आमदार नीलेश काब्राल यांनी दिली.
मे अखेरीस भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा गोव्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. त्यापूर्वी पर्रिकर गोव्यात परत येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement