IndiGo Flight Diverted : स्पाइसजेट आणि कतार एअरवेजनंतर इंडिगो फ्लाइडमध्ये तांत्रिक बिघाड, एका दिवसातील तिसरी घटना
Flight Diverted To Mumbai : तांत्रिक बिघाडामुळे इंडिगो एअरलाईनचं विमान मुंबई विमानतळाकडे वळवण्यात आले. कन्नूरहून दोहासाठी विमानाने उड्डाण केलं होतं.
Indigo Flight Diverted : विमानांमधील तांत्रिक बिघाडांचं सत्र सुरुच आहे. कन्नूरहून दोहाला जाणारे इंडिगो एअरलाईनचं (Indigo Airlines) विमान शुक्रवारी (02 डिसेंबर) मुंबई विमानतळावर वळवण्यात आलं. एकाच दिवसात विमानातील तांत्रिक बिघाडाची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी स्पाइसजेट आणि कतार एअरवेजच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी पाहायला मिळाली होती. त्यानंतर कन्नूरहून दोहासाठी इंडिगोचे विमान निघालेलं विमान तांत्रिक बिघाडामुळे मुंबईत उतरवण्यात आलं. एअरलाइन्स याबाबत माहिती देताना सांगितलं की, खबरदारी म्हणून फ्लाइट क्रमांक 6E-1715 मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली.
इंडिग एअरलाईनने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे, 'ऑपरेटिंग क्रूच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक समस्या असल्याचं लक्षात आलं, त्यानंतर फ्लाइट मुंबईच्या दिशेने वळवण्यात आली. प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी फ्लाइटची व्यवस्था केली जात आहे.' डीजीसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, हायड्रॉलिक लीकमुळे विमानाचं इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं.
इंडिगो फ्लाईटमध्ये तांत्रिक बिघाड
मिळालेल्या माहितीनुसार, एअरबस A320 (VT-ISQ) विमानाने शुक्रवारी केरळमधील कन्नूर येथून उड्डाण घेतसं. विमान दोहाला रवाना होणार होतं. मात्र त्यानंतर विमानाच्या हायड्रोलिक सिस्टीममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्याने विमान तातडीने मुंबईकडे वळवावे लागले. विमान कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतंही निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. विमान उड्डाण दरम्यान तांत्रिक बिघाड क्रूच्या लक्षात आला आणि त्यामुळेच विमान मुंबईकडे वळवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
स्पाइस जेट विमानाचं आपत्कालीन लँडिंग
याआधी शुक्रवारीच स्पाइस जेटच्या फ्लाइटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटनाही समोर आली होती, त्यामुळे विमानाचे कोची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. या विमानात 197 प्रवासी होते. हे विमान सौदी अरेबियातील जेद्दाहून कोझिकोडला जात होते. फ्लाइटच्या हायड्रॉलिक बिघाडामुळे ते कोची विमानतळाकडे वळवण्यात आलं. मात्र, विमानाचे सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.
कतार एअरवेजचे विमानही धावपट्टीवरून परतलं
याशिवाय, चेन्नईहून दोहाला 139 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात शुक्रवारी पहाटे टेक ऑफदरम्यान तांत्रिक बिघाड झाला, त्यानंतर विमान धावपट्टीवरूनच माघारी परतलं. विमानतळ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कतार एअरवेजचे विमान धावपट्टीवर टेक ऑफ करण्याच्या तयारीत असताना समस्या आढळून आली आणि वैमानिकांनी परत जाण्याची परवानगी मागितली. 139 प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आलं आणि शहरातील हॉटेल्समध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली.