एक्स्प्लोर

6 दिवसांत 70 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी, लंडन, पॅरिस आणि हाँगकाँगला जाणाऱ्या विमानांना मिळाल्या धमक्या

आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी इंडिगोच्या 5 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे.

IndiGo Bomb Threat: विमान कंपन्यांना सातत्यानं धमक्या येत आहेत. आज शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 रोजी इंडिगोच्या 5 विमानांना बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. आकासा एअरलाइन्सच्या पाच विमानांना ही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 6 दिवसांत 70 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य

प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे कंपनीने म्हटले आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहोत. मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही सर्व आवश्यक खबरदारी घेत असल्याचे इंडिगोने निवेदनात म्हटले आहे. प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहोत. 14 ऑक्टोबरपासून  70 हून अधिक विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत.

ईमेलद्वारे मिळाली बॉम्बची धमकी

शुक्रवारी रात्री उशिरा आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइट IX 196 वर ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती. ज्यामध्ये 189 प्रवासी होते. हे विमान दुपारी 1.20 वाजता जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. मात्र, तपासादरम्यान विमानाची कसून झडती घेतली असता काहीही संशयास्पद आढळले नाही.

लंडन, पॅरिस आणि हाँगकाँगला जाणाऱ्या विस्तारा विमानांना बॉम्बच्या धमक्या

यापूर्वी तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, त्या नंतर खोट्या निघाल्या. खबरदारी म्हणून विमान फ्रँकफर्टकडे वळवण्यात आले. विस्ताराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइट्सना शुक्रवारी (18 ऑक्टोबर 2024) सोशल मीडियावर सुरक्षेच्या धमक्या आल्या होत्या, त्यानंतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांना प्रोटोकॉलनुसार ताबडतोब सतर्क करण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय राजधानीतून लंडन, पॅरिस आणि हाँगकाँगला जाणाऱ्या विस्तारा विमानांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या, ज्या नंतर खोट्या असल्याचे आढळून आले.

14 ऑक्टोबरला मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटला दिली होती बॉम्बची धमकी

14 ऑक्टोबरला मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. एअर इंडियाचे पहिले विमान मुंबईहून न्यूयॉर्कला जात होते. माहिती मिळताच विमान दिल्लीकडे वळवण्यात आले. हे विमान सध्या  दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर आहे. विमानात 239 प्रवासी होते. दुसरी फ्लाइट इंडिगोची 6E-1275 आहे, ती मुंबईहून मस्कतला जात होती. तिसरी फ्लाइट इंडिगोची 6E 56 आहे. ते मुंबईहून जेद्दाहला जात होते. 

महत्वाच्या बातम्या:

मुंबईहून उड्डाण करणाऱ्या तीन फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी; एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवले, इंडिगोच्या 2 विमानांचीही तपासणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lawrence Bishnoi : बिश्नोई नवा दाऊद इब्राहिम होण्याच्या मार्गावर ? Special ReportEknath Shinde PC : महायुतीच्या जागावाटपावर बैठकीत सकारात्मक चर्चा : एकनाथ शिंदेSpecial Report Santosh Bangar : संतोष बांगर यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रारTOP 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 19  OCT 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
भाजपच्या पहिल्या यादीचा अखेर मुहूर्त ठरला; महाविकास आघाडीकडून सुद्धा 100 उमेदवारांचा फायनल निर्णय!
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
लाडकी बहिण योजनेला स्थगिती, पण मंत्री अदिती तटकरेंनी पुढील हप्त्याची तारीख सांगून टाकली!
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
महाविकास आघाडी स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार की एकत्र? 100 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
समाज राजकारण करण्यासाठी एकत्र आला नव्हता, हरवण्यातसुद्धा विजय असतो, जरांगे पाटलांचे पाडापाडीचे संकेत?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
देवेंद्र फडणवीस अन् चंद्रशेखर बावनकुळे विमानतळावरून थेट गडकरींच्या निवासस्थानी; तब्बल दोन तासांच्या बैठकीत काय घडलं?
Nagpur South West Assembly constituency : देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
देवेंद्र फडणवीसांविरोधात महाविकास आघाडीमधील थेट 'लाडकी बहिण' मैदानात उतरणार? उमेदवार ठरल्याची चर्चा!
Varsha Gaikwad : आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
आशिष शेलारांकडून मुंबईत 'व्होट जिहाद'चा शब्दप्रयोग; खासदार वर्षा गायकवाड यांची निवडणूक आयोगात धाव
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, नुकसानग्रस्तांना भरपाई द्या, मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
Embed widget